कोल्हापूर

'गजेंद्र पाटील परमबीरसिंगांचा भाऊच, वर्दीतले दरोडेखोर गजाआड होतील'

लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल

सकाळ ऑनलाईन टीम

कागल : पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर (anil deshmukh) आरोप करून त्यांचा राजीनामा घ्यायला भाग पाडले. कालच परिवहनमंत्री अनिल परब (anil parab) यांच्यावर निलंबित असलेल्या परिवहन खात्याच्या गजेंद्र पाटील या उपनिरीक्षकाने गुन्हा दाखल करून सीबीआयकडे चौकशीची (complaint on CBI) मागणी केली आहे. गजेंद्र पाटील म्हणजे परमवीरसिंगचा दुसरा भाऊच दिसतो. वर्दीतील हे दरोडेखोर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आडून हजारो कोटींचा त्यांचा गैरव्यवहार लपवू पाहात आहेत. ते लवकरच गजाआड जातील, असा इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुश्रीफ म्हणाले, ‘मंत्री देशमुख यांना राजीनामा द्यायला लावला होता, त्याच पद्धतीचे हे षड्‌यंत्र आहे. केंद्र सरकारने जीएसटीच्या परताव्या पोटीचे २४ हजार कोटी रुपये दोन वर्षांपासून दिलेले नाहीत. (GST returns not given) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातसह पश्चिम बंगाल, ओरिसाचा दौरा करून त्यांना एक हजार कोटींचे पॅकेज दिले, परंतु केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला रुपयासुद्धा दिला नाही. या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार सतत महाराष्ट्राचा अपमान आणि खच्चीकरण करत आहेत. मुकेश अंबानींच्या घरासमोरील ती स्फोटके, त्या गाडीचं पुढं काय झालं, त्याचा मास्टर माईंड कोण आहे, हे एनआयएने तत्काळ तपास लावून जाहीर केले पाहिजे, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT