कोल्हापूर

'चंद्रकांतदादा नेत्यांना तंबी देऊन स्वतःचं हसं करून घेतात'

पाटील यांनी सांभाळून बोललं पाहिजे; हसन मुश्रीफ

सकाळ डिजिटल टीम

कागल : सत्ता गेल्यामुळे भ्रमनिरास झालेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) उठसूट राज्यातील नेत्यांना तंबी देऊन स्वतःचं हसं करून घेत आहेत, असा टोला पत्रकार परिषदेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाटील यांनी तंबी दिल्याबाबत ते बोलत होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘यापूर्वी छगन भुजबळ (chhagan bhujabal) यांना, तुम्ही जामिनावर सुटलेले आहात, तुम्ही निर्दोष झाला नाहीत, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर अशोकराव चव्हाण यांना आणि आता अजितदादांना उद्देशून वक्तव्य केले आहे. (ajit pawar) श्री. पाटील यांनी सांभाळून बोललं पाहिजे. खासदार विनायक राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं मानसिक संतुलन ढासळलेले आहे. त्यांना उपचाराची गरज आहे.

ते म्हणाले, एका न्यूज चॅनेलने केलेल्या सर्व्हेप्रमाणे नरेंद्र मोदींनी संकट काळात कशा पद्धतीने तोंड दिले आहे. देशाची इभ्रत या जगात कशी कमी झाली आहे. त्यापेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कामगिरी किती उजवी आहे व त्यांनी केलेले काम किती चांगले आहे, हे दाखविले आहे. याचा राग चंद्रकांत पाटलांना आला असावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 MI vs RCB : मुंबई इंडियन्स उद्या न खेळताच स्पर्धेबाहेर होणार? महत्त्वाचे अपडेट्स, RCB विरुद्धच्या लढतीपूर्वी वातावरण बिघडले

Crime: तोंडात कापड कोंबले, हातपाय दोरीने बांधले, महिलेला निर्घृणपणे संपवले, २ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, नेमकं काय घडलं?

SSC Topper Story:गरिबी, संघर्ष आणि आईच्या कष्टांवर मात करत मानसी बागुलची दहावीत ९८.२० टक्के झेप

Tamil Nadu Politics: मोठा यू-टर्न! आधी 'त्या' अटींनी वाढवला तिढा; आता VCK कडून TVK ला बिनशर्त पाठिंबा, तमिळनाडूत राजकीय नाट्य

जिंकलंस पोरा...! साताऱ्याच्या साहिल जाधवने Archery World Cup मध्ये जिंकलं पदक; आईने स्वतःचे दागिने विकून घेऊन दिलेला धनुष्य-बाण

SCROLL FOR NEXT