hasan mushrif critisezes to chandrakant patil in event of zp office kolhapur 
कोल्हापूर

चंद्रकांत पाटील म्हणजे 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली' ; हसन मुश्रीफांचा टाेला

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या बदल्यांची चौकशी करा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हणणे म्हणजे 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली' असे म्हणण्यासारखे आहे. अशी टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. जिल्हा परिषदेच्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

महाविकास आघाडीने ज्या बदल्या केल्या आहेत त्यांची सीआयडी चौकशी केली पाहिजे, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याचा समाचार घेताना मुश्रीफ म्हणाले, 'बदल्यांच्या चौकशीची मागणी चंद्रकांत पाटील यांनी करणे म्हणजे, 'चुहे खाके बिल्ली हज को चली' असेच आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी २०१४ पासूनच्या सर्व बदल्यांची सीआयडी चौकशी करू असे सांगितले आहे.

पार्थ पवार प्रकरणाबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले, हा पवार साहेबांच्या कुटुंबातला प्रश्न आहे. पवार कुटुंबाची ऐकता याची उदाहरणे राज्यात दिली जातात. पवार साहेब कुटुंब एकसंध ठेवण्यासाठी समर्थ आहेत.

पंचांग बरोबर पण मुहूर्त चुकीचा 

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना मुश्रीफ म्हणाले, 'सत्ता गेल्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे ते अभ्यास न करता आंदोलने करत आहेत. फडणवीसांचे पंचांग बरोबर असले तरी मुहूर्त चुकीचे आहेत. म्हणूनच कोरोनाच्या संकट काळात ते आंदोलने करत आहेत. महाविकास आघाडी वर ते जेवढ्या टीका करतील तेवढी ही आघाडी अधिक घट्ट होईल.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT