Hasan Mushrif  sakal
कोल्हापूर

Hasan Mushrif : एक दिवस मुश्रीफांसाठी... कोल्हापुरात अजित पवारांच्या सभेला लाखांवर उपस्थितीचे नियोजन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उत्तरदायित्व सभेच्या नियोजनासाठी येथे कार्यकर्त्यांची बैठक बोलाविण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

मुश्रीफ : अजित पवार यांच्या सभेसाठी बैठक

Kolhapur News- कोल्हापुरात तपोवन मैदानावर एक लाखाहून अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उत्तरदायित्व सभा होईल. उच्चांकी गर्दीमुळे राज्यात उच्चांकी गर्दीची सभा करू, असा विश्‍वास वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उत्तरदायित्व सभेच्या नियोजनासाठी येथे कार्यकर्त्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. या सभेला कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातून ३५ ते ४० हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील, असेही ते म्हणाले.

युवराज पाटील, शितल फराकटे, प्रकाशराव गाडेकर, सूर्यकांत पाटील, प्रवीणसिंह भोसले, सतीश पाटील-गिजवणेकर, काशिनाथ तेली, सिद्धार्थ बन्ने, दत्ता पाटील-केनवडेकर, ॲड. सुधीर सावर्डेकर यांची भाषणे झाली.

विकास पाटील यांनी स्वागत केले. भैया माने यांनी प्रास्ताविक केले. या वेळी नवीद मुश्रीफ, वसंतराव यमगेकर, किराण कदम, चंद्रकांत गवळी, तात्यासाहेब पाटील, पद्मजा भालबर, पांडुरंग पाटील, देवानंद पाटील, संजय फराकटे, नारायण पाटील, आर. व्ही. पाटील, राजेंद्र माने, सदानंद पाटील, महेश चौगुले, शिरीष देसाई, दिनकरराव कोतेकर, ॲड. संग्राम गुरव, शिवाजीराव देसाई, नारायण ढोले, संजय चितारी उपस्थित होते.

एक दिवस मुश्रीफांसाठी.

भैय्या माने म्हणाले, ‘‘मंत्री हसन मुश्रीफ यांनी उभी हयात गोरगरिबांसाठी खर्ची घातली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापूरची सभा महाराष्ट्रात उच्चांकी होण्यासाठी रविवार (ता. १०) हा फक्त एक दिवस मंत्री मुश्रीफ यांच्यासाठी देऊया आणि कोल्हापूरचा लौकिक महाराष्ट्रभर पोहोचवूया.’’

कुणीही उपाशी राहणार नाही...

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘मनापासून व तळमळीने स्वयंसेवक बनवून काम करा. आलेल्या प्रत्येक माणसाची विशेषतः माता-भगिनींची आपले कुटुंबीय समजून काळजी घ्या. सभेला निघाल्यापासून ते परतून घरी जाईपर्यंत सर्वजण सुरक्षित पोहोचतील, याची दक्षता घ्या. सभेला आलेला एकही माणूस उपाशी राहणार नाही, याची जाणीवपूर्वक काळजी घ्या.’’(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT