Hatkanangale Lok Sabha constituency Shiv Sena M dhairyashil mane demand Maratha Reservation Center should get it 
कोल्हापूर

''केंद्र सरकारने कंगना राणावतकडे लक्ष देण्यापेक्षा रानावनात काम करणाऱ्यां मराठा तरुण-तरुणींकडे लक्ष द्यावे'' : धैर्यशील माने

सागर कुंभार

रुकडी (कोल्हापूर)  : "केंद्रशासनाने तमिळनाडूच्या आरक्षणाप्रमाणे महाराष्ट्रातील मराठा समाजास आरक्षण देऊन या समाजातील तरुण-तरुणींना  मुख्य प्रवाहामध्ये आणावे.मराठा आरक्षण हे महाराष्ट्रामध्ये होण्यासाठी केंद्रानेही महाराष्ट्र राज्यासारखा पुढाकार द्यावा. कंगना राणावतकडे लक्ष देण्यापेक्षा रानावनात काम करणाऱ्या मराठा समाजातील उपेक्षित तरुण-तरुणींकडे लक्ष द्यावे आणि मराठा आरक्षण केंद्राने मिळवून द्यावे"अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी संसद अध्यक्ष ओम बिर्ला यांचेकडे केली. यावेळी ते दिल्ली येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये बोलत होते.

 महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण देशभर गाजत आहे. मराठा आरक्षणामुळे या समाजातीली तरुण-तरुणींना नवसंजीवनी मिळणार आहे.महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या बत्तीस टक्के लोकसंख्या ही मराठा समाजाची असून त्यापैकी नव्वद टक्के समाज हा आर्थिकदृष्ट्या दुर्भल व आर्थिकदृष्ट्या मागास आहे. सध्या तामिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण दिले आहे.

मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव केला जात आहे. मी ज्या जिल्ह्यातून आलो आहे तो कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी शाहू महाराजांचा जिल्हा आहे. त्यांनी देशाला आरक्षणाची देण दिली मात्र महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना मराठा आरक्षणासाठी झगडा करावा लागत आहे. त्यामुळे मराठा आरक्षण हे महाराष्ट्रामध्ये होण्यासाठी केंद्रानेही महाराष्ट्र राज्यासारखा पुढाकार द्यावा व  मराठा आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी संसदेत केली आहे.   

संपादन - अर्चना बनगे
                         

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Singer Nisar Vaynad : उदित नारायण यांची ‘कार्बन कॉपी’! प्रसिद्ध गायकाचे वयाच्या ४४व्या वर्षी निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

Mohan Bhagwat: ब्रिटनमधील हिंदूंची ब्रिटन हीच कर्मभूमी: मोहन भागवत; कर्मभूमीशी प्रतारणा करण्यास हिंदुत्व सांगत नाही

Baba Amte Anandwan: बाबा आमटेंचे ‘आनंद निकेतन’ हस्तांतराच्या वाटेवर, पुनर्बांधणीचा खर्च पेलवेना, आनंदवनातील कॉलेज अडचणीत

Motivational Story: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या; रमाबाईंच्या जिद्दीची सरन्यायाधीशांनी घेतली दखल, संघर्षाची प्रेरणादायी कहाणी..

तुम्हाला मूल्यमापन करण्याची गरज आहे का?

SCROLL FOR NEXT