Hatkanangale loksabha Sadabhau Khot esakal
कोल्हापूर

Sadabhau Khot : 'दीड वर्ष आम्ही मशागत केली आणि वीस दिवसांत धैर्यशील माने खासदार झाले, आता त्यांनी पैरा फेडावा'

शरद पवार बडे मिया आणि रोहित पवार छोटे मिया आहेत.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (Hatkanangale Loksabha Constituency) दीड वर्ष आम्ही मशागत केली आणि वीस दिवसांत धैर्यशील माने खासदार झाले. आता माने यांनी आमचा पैरा फेडण्यासाठी २०२४ च्या निवडणुकीत आपला प्रचार करावा, असे आवाहन माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले.

शासकीय विश्रामगृहात खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य शासनाने केलेल्या झोन बंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार होते. काही साखर कारखानदारांनी साखर महासंघामार्फत सरकारला झोन बंदी करण्याची विनंती केली होती. त्याला राज्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला. त्यामुळे एका रात्री झोन बंदीची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असेही खोत यांनी सांगितले.

झोन बंदी तत्काळ उठवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. शरद पवार बडे मिया आणि रोहित पवार छोटे मिया आहेत. रोहित यांनी साखर कारखान्यांमधील हवाई अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचेही खोत यांनी स्पष्ट केले.

मतदारसंघात दीड वर्ष लोकांशी संपर्क ठेवला. लोकांचे प्रश्‍न सोडवले. त्यानंतर धैर्यशील माने यांच्या प्रचाराची धुरा आपल्यावर सोपवली. ही धुरा यशस्वीरित्या पार पाडली. आता २०२४ मध्ये याच मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. त्यामुळे माने यांनी २०१९ चा पैरा फेडण्यासाठी माझा प्रचार करावा, असे आवाहन खोत यांनी केले.

‘मला लढायला शिकवू नका’

राजू शेट्टी (Raju Shetti) यांचा कार्यकर्ता मला कोल्हापुरात फिरू देणार नाही म्हणतो. मी मराठा आहे. मला लढायला शिकवू नका. इशारा दिलेल्या कार्यकर्त्याला विधानसभेची निवडणूक लढवताना पाय थरथरत होते. माझ्यामुळेच अनेक ठिकाणी त्यांना प्रचार करता आला. आम्ही तलवारी घेऊन लढणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे तलवारी गुंडाळून ठेवणाऱ्यांनी कोल्हापुरात फिरू देणार नसल्याची भाषा बोलू नये, अशी टीका सावकार मादनाईक यांचे नाव न घेता केली.

‘त्यांच्या’ आंदोलनाचा दिखावा सर्वांना माहिती’

लोकसभा निवडणूक आली आहे. काहीजण (राजू शेट्टी यांचे नाव न घेता) ऊस दराचे आंदोलन करतील. त्यांनी एक दर मागायचा, त्यानंतर कारखान्यांसोबत चर्चा आणि त्यातून एक दर निघतो. त्यामध्ये पहिला हप्ता एवढा, दुसरा एवढा आणि तिसरा किती याची ठरवून चर्चा होते; मात्र पहिल्यानंतर दुसरा आणि तिसऱ्याबाबत चर्चाच होत नाही. त्यामुळे त्यांच्या अशा आंदोलनाचा दिखावा सर्वांना माहिती असल्याची टीकाही खोत यांनी केली.

‘राजू शेट्टी हे कार्यकर्त्यांना कुजवणारे नेते’

नेतृत्व करणाऱ्यांकडे, दातृत्व, मातृत्व आणि पितृत्वाचे गुण असावे लागतात. पण, राजू शेट्टी कार्यकर्त्यांना कुजवणारा नेते आहेत. दरम्यान, रवी तुपकर यांच्यावर कारवाई करताना जालिंदर पाटील यांनी माघार का घेतली असा टोलाही खोत यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT