Hatkanangle, swab in Shirol will be available soon 
कोल्हापूर

हातकणंगले, शिरोळमधील स्वॅब अहवाल लवकर मिळणार

सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी : इचलकरंजीसह हातकणंगले आणि शिरोळ तालुक्‍यातील स्वॅब तपासणीसाठी स्वतंत्र लॅब सांगली येथे करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. या दोन्ही तालुक्‍यांत मोठ्या संख्येने येणारे नागरिक व रुग्ण यांची स्थिती पाहता सांगलीतील भारती हॉस्पिटलमध्ये ही लॅब सुरू करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. 

हातकणंगले आणि शिरोळ तालुक्‍यातील रुग्णांसाठी तसेच बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी आयजीएम रुग्णालय हे मुख्य केंद्र बनले आहे. आतापर्यंत या रुग्णालयातून तब्बल 1 हजार 35 स्वॅब तपासणीसाठी कोल्हापूरकडे पाठविले होते. इचलकरंजीसह शिरोळ तालुक्‍यातील एकूण 7 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले; मात्र गेले आठवडाभर कोल्हापुरातील लॅबमध्ये मोठ्या प्रमाणात स्वॅब येत असल्याने इचलकरंजीतील स्वॅब याच ठिकाणी ठेवण्यास सांगितले होते. त्यामुळे सुमारे 394 स्वॅब कालपर्यंत याच ठिकाणी होते. काल दुपारी यातील 250 स्वॅब तपासणीसाठी कोल्हापूरला गेले आहेत. 

कोल्हापूर येथे पाठविलेल्या स्वॅबचा अहवाल उशिरा येत आहे. याबाबत आमदार प्रकाश आवाडे यांनी शासनाला तसेच आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना निवेदन देऊन पाठपुरावा सुरू केला. यड्रावकर यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन शासनाकडे हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यासाठी कोरोना रुग्ण स्वॅब तपासणीसाठी स्वतंत्र लॅब सुरू करण्यास पाठपुरावा सुरू केला आहे. सांगलीच्या भारती हॉस्पिटलमध्ये असे केंद्र सुरू होणे शक्‍य आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत इचलकरंजीसह दोन्ही तालुक्‍यासाठी स्वतंत्र लॅब सुरू होणार असल्याचे समजते. यामुळे या ठिकाणच्या रुग्णांचा अहवाल तातडीने येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT