He Holds Scissors In His Hand For Social Service Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

समाजसेवेसाठी त्याने हातात धरली कात्री 

सुनील कोंडुसकर

चंदगड : तो सर्वसामान्य कुटुंबातील तरुण. शेती हाच त्याचा व्यवसाय. कोरोनामुळे गावगाडा ठप्प झालेला. परगावातून येणारा केश कर्तनकार संचारबंदीमुळे गावात येऊ शकत नाही. अशा वेळी समाजसेवा म्हणून त्याने हातात कात्री आणि वस्तरा धरला आहे. गावातील नागरिकांचे तो केश कर्तन करीत आहे. सुळये (ता. चंदगड) येथील जगदीप दीपक माळी असे या तरुणाचे नाव. 

चंदगड-हेरे मार्गावरील हे छोटे गाव. चंदगड-आजरा भागात आजही गावगाड्यातील काही व्यवहार जात-वर्गावर आधारीत आहेत. केस कापणे हे काम न्हावी समाजाकडून केले जाते. सुळये येथे न्हावी समाज नाही. परगावातील न्हावी आठवड्यातून ठराविक दिवस गावात येतो. लहान मुले, वयोवृध्द नागरीक, रुग्ण यांच्यासाठी ती मोठी सोय होते. अन्य ग्राहकही त्याचा लाभ घेतात. पैशाच्या आणि धान्याच्या (बैतं) मोबदल्यात ही सेवा दिली जाते. परंतु संचारबंदीमुळे परगावचा न्हावी गावात येऊ शकत नाही.

शहरातील सलून बंद आहेत. वीस दिवसाहून अधिक काळ न्हावीच उपलब्ध न झाल्याने अनेकांची अडचण झाली होती. अशा वेळी जगदीपने मदतीचा निर्णय घेतला. हातात कात्री व वस्तरा घेऊन तो केस कर्तन करीत आहे. अनुभव नसतानाही आत्मविश्‍वासाच्या जोरावर तो हे काम करीत आहे. लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद आहे. गावातील काही जण त्याची खिल्ली उडवत असले तरी अडचणीच्या काळातील त्याचे हे योगदान महत्वपूर्ण आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT