He Kept The Food Supply Of Ichalkaranji Smooth Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

त्यांनी इचलकरंजीचा अन्नधान्य पुरबठा ठेवला सुरळीत

सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी : लॉकडाउन काळात 4 लाख नागरिकांच्या उपजीविकेसाठी 65 कामगार नियमित काम करत राहिले. या कामगारांमुळे गेली दोन महिने झाले संपूर्ण शहरात अन्नधान्य उपलब्ध होत आहे. कोरोनाच्या भीषण परिस्थितीत परराज्यातील येणाऱ्या प्रत्येक मालगाडीतून स्वत:ची काळजी घेत हे माथाडी कामगार अन्नधान्य उतरत आहेत. तर चालक प्रत्येक ठिकाणी पोहचवत आहेत. यात धान्य गोदाम, अन्नधान्य व्यवसायातील माथाडी कामगार व टेम्पो चालकांचा समावेश आहे. 

लॉकडाउन काळात जीवनावश्‍यक वस्तू वगळता सर्व काही बंद राहिले. शहरात धान्यओळ, सरस्वती मार्केट व अन्य ठिकाणी अन्नधान्य विक्रेत्याचीं होलसेल दुकाने आहेत. त्यामुळे येथे नियमित परराज्यातून अन्नधान्याची माल वाहतूक होत असते. त्यावर अनेकांचे जगणे अवलंबून आहे. असे 65 कामगार या व्यवसायात लॉकडाउन काळातही काम करत राहिले. एकीकडे पूर्ण शहर बंद असताना या काळात मात्र हे कामगार मालगाडीतून माल उतरविणे, परत तो विविध ठिकाणी पोहच करणे अशी कामे करतच होते. 

लॉकडाउन काळात गर्दी टाळत घरीच बसा असे आवाहन प्रशासन करत होते. त्यात परराज्यातील अन्नधान्याच्या मालाच्या गाड्या शहरात येतच होत्या. त्यामुळे परराज्यातील येणाऱ्या मालगाडीतून माल उतरविणे हे संकट झेलत काटेकोरपणे काळजी घेत हे कामगार आपले काम करतच राहिले. तसेच शहरातील लाखो कुटुंबाना रेशन धान्याचे वाटप करण्यात आले. यासाठी धान्य गोदामात हे माथाडी कामगार नियमीत काम करतच होते. 

मास्क लावून उतरविला माल
परराज्यातील येणाऱ्या गाडीतून माल उतरताना अधिक काळजी घ्यावी लागत आहे. तोंडाला मास्क लावून माल उतरविला जातो. कोरोनाच्या काळात हे काम घातक असले तरी अत्यावश्‍यकेतेमुळे करावे लागते. 
- वल्लीसाहब जमादार, माथाडी कामगार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT