He took life for a piece of land 
कोल्हापूर

जमिनीच्या तुकड्यासाठी त्याने घेतला जीव

सकाळ वृत्तसेवा

चुये (कोल्हापूर) ः नंदगाव (ता. करवीर) येथे शेतजमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत एका जखमीचा आज मृत्यू झाला. फक्रुद्दीन बाबासाहेब मुजावर (वय 45) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी इस्पुर्ली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

फक्रुद्दीन बाबासाहेब मुजावर व बाळासाहेब दादू चौगुले या कुटुंबांमध्ये शेतजमिनीच्या हक्कावरून काल (बुधवारी) दुपारी वाद झाला. यावेळी काठीचा घाव वर्मी लागल्याने फक्रुद्दीन बाबासाहेब मुजावर गंभीर जखमी झाले. आज सकाळी अकराच्या सुमारास खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. मारामारीच्या घटनेची नोंद इस्पुर्ली पोलिस ठाण्यामध्ये आहे. संदीप बाळासाहेब चौगुले व सागर बाळासाहेब चौगुले यांना अटक केली आहे. दोन्ही कुटुंबांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत.

फक्रुद्दीन मुजावर व बाळासो चौगुले यांच्यात शेतजमिनीच्या हक्कावरून काल भुईमुगाची पेरणी करताना जोरदार वादावादी झाली. या वेळी एकमेकांना काठीने मारहाण झाली. जखमी फक्रुद्दीन यांना सरकारी रुग्णालयात दाखल केले; मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. फक्रुद्दीन मुजावर यांनी बाळासाहेब दादू चौगुले, संदीप बाळासाहेब चौगुले व सागर बाळासाहेब चौगुले यांच्याविरोधात मारहाण केल्याची फिर्याद दिली. संदीप दादू चौगुले यांनी फक्रुद्दीन बाबासो मुजावर, जहिदा फक्रुद्दीन मुजावर, जीशान फक्रुद्दीन मुजावर व तमसून फक्रुद्दीन मुजावर यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. तपास एस. एस. चव्हाण करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smit Machar: ''तो' माझ्यावर वार करत होता, तरीही...'' कॅप्टन स्मित मछार यांनी सांगितला थरार; विमानावरील हल्ल्यानंतरचा व्हिडिओ समोर

Health Center in Darkness: नेत्यांसह प्रशासन झोपलंय का? लिहाखेडीत आरोग्य उपकेंद्रच अंधारात; प्रशासनाला जाग कधी? दोन वर्षांपासून वीजपुरवठा बंद

Latest Marathi News Live Update: पेन्शनधारकांच्या खात्यात महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेन्शन जमा

Navi Mumbai: नवी मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट, मोरबेत ७३ टक्के पिण्यायोग्य साठा

हो, त्या सासू म्हणून खूप कडक... सून पूजा बिरारीचं सुचित्रा बांदेकरांबद्दल वक्तव्य;म्हणते, 'मी सगळ्यांना हेच सांगते की...

SCROLL FOR NEXT