He Traveled 340 km by bicycle For Home Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

सायकलने 340 कि.मी प्रवास करून त्याने गाठले गाव

सकाळवृत्तसेवा

चंदगड ः अडकूर (ता. चंदगड) येथील संदीप घोरपडे याने टेंभुर्णी (जि. सोलापूर) ते अडकूर पर्यंत 340 किलो मीटरचा प्रवास सायकलने करून घर गाठले. कोरोनामुळे प्रवासी वाहतुक बंद झाल्याने त्याने हा मार्ग स्विकारला. त्यासाठी टेंभुर्णी येथे त्याने नवीन सायकल खरेदी केली. सलग तीन दिवस प्रवास करून तो कुटुंबात परतला. 

संदीप एका कारखान्यात नोकरीला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉक डाऊन जाहीर झाल्यावर तिथे राहणे शक्‍य नव्हते. गावाकडे यायचे तर वाहतुकही बंद होती. प्रवासी वाहतुकीची सर्वच साधने बंद असल्यामुळे काय करायचे असा प्रश्‍न होता. त्याचवेळी सायकलचा विचार मनात आला. एका सायकल दुकानदारला विनंती करून त्याने सायकल खरेदी केली. पहिल्या दिवशी सुमारे 135 किलो मीटरचा प्रवास करून तो उदनवाडी येथे पोहोचला. तिथल्या ग्रामस्थांनी दया दाखवून त्याला आसरा दिला. रात्रीचे व सकाळचे जेवणही तिथेच दिले.

सायकल मारण्याची सवय नसल्यामुळे अंग मोडून आले होते. परंतु गावाकडे येण्याची ओढ थांबू देत नव्हती. दुसऱ्या दिवशी तो कोल्हापुरात पोहोचला. रात्री तिथे विश्रांती घेऊन तिसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा प्रवास सुरू केला. सायंकाळी तो गावात पोहोचला. कोरोनाची भिती, गावोगावी बंद केलेले रस्ते, महामार्गावरील वाहतुक, पोलिस यंत्रणा, माणुसकी आणि अवहेलना असे सर्व प्रसंग या निमित्ताने पहायला मिळाले. हा प्रसंग खूप काही सांगून आणि शिकवून गेल्याचे संदीप सांगतो. तो सध्या होम कोरंटाईन आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT