The headmaster going to villages and guiding students jamboti 
कोल्हापूर

असे 'हे' मुख्याध्यापक, 'जे' घेत आहेत विद्यार्थ्यांच्या गावोगावी जाऊन शिकवणी...

मिलिंद देसाई

बेळगाव - दुर्गम भागातील दहावीचे विद्यार्थी अभ्यासापासुन दुर जाऊ नयेत, यासाठी खानापूर तालुक्‍यातील एका मुख्याध्यापकाने गावागावात जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. शाळा बंद असली तरी शाळेच्या आवारात किंवा झाडाखाली सामाजिक अंतर ठेऊन विद्यार्थ्यांना शिकविले जात आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी सुरु असलेली मुख्याध्यापकाची धडपड सर्वांसाठी आदर्श ठरत आहे.

गावात जाऊन शिकविण्याचा निर्णय

जांबोटी (ता. खानापूर) येथील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी लॉकडाऊन सुरु झाल्यापासुन चिखले, कालमनी, कुसमळी, चापोली, कापोली (के. जी) आदी भागातील गावात जाऊन दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यास सुरुवात केली आहे. जांबोटी भागातील अनेक गावे दुर्गम भागात असुन विद्यार्थी मोठी पायपिट करीत जांबोटी, कणकुंबी आदी भागातील शाळांमध्ये येत, असतात. मार्च महिन्यात होणारी दहावीची परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच परीक्षा पुन्हा कधी होणार आहे. याबाबतही अनिश्‍चितता असल्याने अनेक विद्यार्थी अभ्यासापासुन दुर जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या गावात जाऊन शिकविण्याचा निर्णय सडेकर यांनी घेतला व गेल्या अनेक दिवसांपासुन दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.

पालक व ग्रामस्थांमधुन समाधान

सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण खात्याने पुढाकार घेतला आहे. तसेच शिक्षकही सातत्याने मोबाईलवरुन विद्यार्थ्यांशी संवाद साधीत आहेत. मात्र ग्रामीण भागातील अनके विद्यार्थ्यांकडे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे गावात जाऊन थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला जात असल्याने विद्यार्थ्यांमधील परीक्षेची भिती कमी झाली आहे. त्यामुळेच सडेकर यांनी गावागावात जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत पालक व ग्रामस्थांमधुन समाधान व्यक्‍त होत आहे.
 

दहावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा होणार नाहीत अशी भावना निर्माण झाली आहे. मात्र परीक्षा घेतली जाणार आहे हे शिक्षण खात्याने स्पष्ट केले आहे त्यामुळे विद्यार्थी अभ्यासापासुन दुर जाऊ नयेत यासाठी गावात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवित आहे.
महेश सडेकर - मुख्याध्यापक, जांबोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dino Morea: राहत्या घरातून डिनो मोरियाला अटक! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणाने अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

Purnekar Murder Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा मोठा खुलासा; राजकीय दबावाचा आरोप, पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या?

जन्म-मृत्यू प्रमाणपत्र आता फक्त ऑनलाइन ;पालिका वॉर्ड कार्यालयातील नागरिकांच्या फेऱ्या टळणार

तेजश्री प्रधानचा नजरेत भरणारा लूक! फ्रील साडी अन् खुललेलं रुप पाहून चाहते घायाळ, Viral Video

PF Claim Reject: PFचा पैसा काढताना करू नका या 10 चुका! नाहीतर रिजेक्ट होईल तुमचा क्लेम

SCROLL FOR NEXT