health workers during rains in ajra taluka of kolhapur district do their duty in heavy rains  Sakal Digital
कोल्हापूर

Video : कडक सॅल्युट! लसीकरणासाठी पावसात आरोग्यसेविकांची पायपीट

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : राज्यात पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे, सर्वत्र कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान पावसाची पर्वा न करता जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचारी कर्तव्यात खंड पडू देत नाहीयते. पडणाऱ्या पावसात घरोघरी जात लसीकरण करणाऱ्या आरोग्य सेविकांचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. पाणी आणि चिखलात वाट तुडवत या सेविका पायपीट करताना या व्हिडीओत दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या लहान मुलांचे लसीकरण आणि हर घर दस्तक या मोहिमेच्या माध्यमातून कोरोना विरोधातील लसीकरण मोहीम राबवली जात आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुका भादवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत पेरणोली उपकेंद्र आहे. या उपकेंद्राच्या अंतर्गत असलेले शंभरहून अधिक धनगरवाड्यांमध्ये पायपीट करत जावे लागते. सध्या मोठ्या प्रमाणात पडत असलेल्या पावसात देखील आरोग्य साहाय्यक पी. आर. नाईक, डी. एस. गोविलकर, रेखा दोरुगडे आणि लक्ष्मी जाधव या धनगरवाड्यावरच्या पोरांच्या लसीकरणासाठी अव्याहतपणे झटत आहेत.

जंगलातून तब्बल साडेतीन ते चार किलोमीटरचा पायी प्रवास करून या महिली कर्मचारी भर पावसात सेवा बजावत आहेत, दरम्यान त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांकडून या आरोग्यसेविकांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT