The Heat Of The Day Grew, Social Distancing Broke Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

ऊन वाढले, सोशल डिस्टन्सिंग तुटले

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : केंद्र शासनातर्फे आलेल्या मोफत धान्याचे वाटप रेशन दुकानांत होत आहे. रोज ठराविक कार्डधारकांनाच रेशन वाटपाच्या सूचना असताना काही दुकानांसमोर गर्दी होत आहे. यातही उन्हांच्या झळा वाढल्यामुळे ग्राहक सावलीच्या शोधात एकत्र येत असल्याने सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला जात आहे. शहरातील तालुका संघाच्या रेशन दुकानांसमोरील आजचे चित्र असेच होते. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून दुकानासमोरील गर्दी कमी केली. 

लॉकडाउनमुळे हातावर पोट असलेल्यांची रोजंदारी बुडाली आहे. त्यांना आता रेशनच्या धान्याचाच आधार आहे. दोन दिवसांपासून प्रती व्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ वाटपाची कार्यवाही सुरू आहे. धान्य संपेल या भीतीने लाभार्थी दुकानांसमोर गर्दी करीत आहेत. आज तालुका संघाच्या रेशन दुकानासमोर दोनशे ते अडीचशे लाभार्थी गोळा झाले होते. उपस्थित सर्व लाभार्थींचे कार्ड गोळा करून धान्य वाटप करण्याचे नियोजन होते. कार्ड देऊन लोक रांग सोडून एकत्र येऊ लागले. दुकानासमोर मारलेल्या चौकोनाचाही काहीच उपयोग झाला नाही 

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. कडक उन्हामुळे लाभार्थी सावलीच्या शोधात गर्दी करीत आहेत. त्यासाठी प्रशासनाने दुकानदारांना मंडप उभारणीच्या सूचना दिल्या आहेत. तालुका संघाने मंडप उभारलेले नाहीत. यामुळे उन्हापासून बचावासाठी सुपर मार्केटसमोरील झाडांचा व पॅसेजचा लाभार्थींनी आसरा घेतला. त्यामुळे तेथेही गर्दी झाली. दुकानांमध्ये सॅनिटायझरचा वापर सक्तीचा केला असताना त्याची कार्यवाहीसुद्धा बहुतांशी ठिकाणी झाल्याचे दिसत नाही. 

50 ते 100 जणांनाच रेशन वाटप करा 
एकीकडे कोरोनाला हरविण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळण्यासह रस्त्यावर न येण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे, परंतु दुसऱ्या बाजूला धान्यासाठी होणाऱ्या गर्दीने कोरोनाला आमंत्रित करण्याचाच धोका वाढत आहे. रोज 50 ते 100 कार्डधारकांनाच रेशन वाटपाचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत भाजपचे आनंद पेडणेकर यांनी व्यक्त केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT