heavy rain impact Ichalkaranji dam on the Panchganga river is under water 
कोल्हापूर

परतीच्या पावसाचा कोल्हापुरात धुमाकुळ : इचलकरंजी बंधारा पाण्याखाली

सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात कालपासून परतीच्या पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. आज दुपारपासून शहरासह इतर ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आणखी चार दिवस परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे राधानगरी धरणातून 1200 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होत आहे. तर, चिकोत्रा, चित्री, जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. पंचगंगा नदीवरील इचलकरंजी हा बंधारा पाण्याखाली आहे. 


शनिवारी (ता. 10) दुपारी 1वाजून 33 मिनिटाने सूर्याने चित्रा नक्षत्रात प्रवेश केला आहे. यावेळी जोरदार पाऊस होईल, असा पर्जन्य अंदाज होता. त्यानूसार कालपासून जोरदार वारा व विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान, जिल्ह्यात भात कापणी, सोयाबीन व भुईमूग काढणीला हा पाऊस मारक ठरणात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक गगनबावडा, शाहुवाडी, राधानगरी, हातकणंगले व करवीर तालुक्‍यातील काही भागात जोरदार पाऊस झाला.

खळ्यावर मळलेले भात पावसापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. आज दिवसभर उष्मा जाणवत होता. दुपारी पाऊस येणारे याचा अंदाज बांधून शेतकऱ्यांनीही भात मळणी करताना आवश्‍यक काळजी घेतली होती. तरीही, दिशाहिन असणाऱ्या पावसामुळे मळलेले भात भिजले आहे. सोयाबीन काढण्यासाठीही मोठा अडथळा आला आहे. भूईमुग शेंगा भिजल्या तरीही त्याला फारसा परिणाम होणार नसल्याचे चित्र आहे. पण शेंगा जास्त वेळ पाण्यात भिजल्या तर मात्र फटका बसणार आहे. 

जिल्ह्यातील बंधाऱ्यांवरील पाणी पातळी : 
राजाराम 10.5 फूट, सुर्वे 10.8 फूट, रुई 38.6 फूट, इचलकरंजी 34.6 फूट, तेरवाड 39.9 फूट, शिरोळ 26.9 फूट, नृसिंहवाडी 23.9 
फूट, राजापूर 14.3 फूट आहे.  

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

SCROLL FOR NEXT