Weather Update  Esakal
कोल्हापूर

Weather Update : पहाटेपासून कोल्हापूर शहर, परिसरात मुसळधार पाऊस; राज्यातील 'या' भागांमध्ये पावसाची शक्यता

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काही राज्यांमध्ये पाऊस हजेरी लावत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या काही भागांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. काही शहरांमध्ये थंडी वाढू लागली आहे. तर पहाटेपासून थंडी तर दुपारच्या सुमारास उकाडा जाणवत आहे. अशातच, राज्यासह देशातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

नोव्हेंबर महिना सुरू होऊन आठवडा उलटला असला तरी राज्यात अद्याप उकाडा जाणवत आहे. तर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 9 नोव्हेंबरपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पहाटेपासून कोल्हापूर शहर आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

कालपासून कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.राज्यात गेल्या 3-4 दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसत आहे.

सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पुढील दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात 10 नोव्हेंबरपासून थंडीत वाढ होईल, असा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात २४ तासांचा सोपा रुटीन; काय खावं, किती व्यायाम करावा? सगळंच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT