heavy rain in kolhapur tree collapsed on car
heavy rain in kolhapur tree collapsed on car 
कोल्हापूर

कोल्हापूरला पावसाने झोडपले ; गाड्यांवर कोसळले भले मोठे झाड 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - गेल्या महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसाने जोरदार पुनरागमन केले असून आज शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही दमदार पाऊस सुरू आहे. दुपारी शहरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्ससमोरील एक मोठे झाड चार गाड्यांवर पडून गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या गाड्यात कोण नसल्याने सुदैवाने कोण जखमी झाले नाही. 

याशिवाय शास्त्रीनगर, टॉऊन हॉल चौकातही रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक कोंडी झाली. सकाळी नऊ वाजता शास्त्रीनगर परिसरात एक झाड कोसळले. दुपारी एक वाजता पंचायत समितीसमोरील एक झाड पडले. दुपारी साडेतीनच्या सुमारास महालक्ष्मी चेंबर्ससमोरील मोठे झाड कोसळले. या झाडाखाली चार चारचाकी गाड्या सापडल्या, या गाड्यांचे मोठे नुकसान झाले. महापालिकेच्या अग्नीशमक दलाने कटरच्या सहाय्याने हे झाड तोडून त्याखाली सापडलेल्या गाड्या बाहेर काढल्या आणि रस्ता रिकामा केला. 

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस असून नद्यांच्या पातळीतही मोठी वाढ झाली आहे. पंचगंगेची पातळी 24 तासांत दहा फुटांनी वाढली असून या नदीवरील राजाराम बंधारा आज तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला. ग्रामीण भागातही पावसाचा जोर आहे. पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिके धोक्‍यात आली होती, त्यामुळे चिंतेत असलेला बळीराजा पावसाने जोर धरल्याने सुखावला आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT