Heavy rains again in Kolhapur
Heavy rains again in Kolhapur 
कोल्हापूर

परतीच्या पावसाची हजेरी : कोल्हापुरात पावसाचा पुन्हा जोर 

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : परतीच्या पावसाने आज पुन्हा शहरात चांगलीच हजेरी लावली. दुपारी साडेबाराला सुरू झालेला हा पाऊस सुमारे तास-दीड तास संततधार कोसळत राहिल्याने सर्वत्र पाणीच पाणी असे चित्र राहिले. दरम्यान, गेली चार दिवस कडकडीत उन्हाचा तडाखा शहराने अनुभवला. मात्र, आजच्या पावसाने पुन्हा गारवा निर्माण झाला. 

हेही वाचा - व्यापाऱ्यांनो ‘जीएसटी’ भरा सहज आणि सोप्या पध्दतीने
नऊ सप्टेंबरला रात्री शहराला पावसाने चांगलेच झोडपले होते. शहर आणि उपनगर परिसरातील अनेक गल्ल्यांत पाणी घुसले आणि मोठे नुकसान झाले. ढगफुटीसदृश्‍य या पावसाने दोन दिवस जोरदार हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाची तुरळक हजेरी होती. आजची सकाळ उजाडली तीच ढगाळ वातावरणाने. सकाळपासूनच हवेत गारवा होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. दरम्यान, शनिवार असल्याने बाजारपेठेत चांगली गर्दी होती. मात्र, पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. 

संपादन -  अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT