Heavy rains in western part of Kolhapur Heavy rain forecast for Saturday warning alert 
कोल्हापूर

कोल्हापुरात पश्‍चिम भागात अतिवृष्टी : शनिवारपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज, सर्तकतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसाने सळो की पळो करुन सोडले. आज रात्री नऊनंतर करवीर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागासह गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्‍यात दहा ते पंधरा मिनिटेच ठिक-ठिक़ाणी अतिवृष्टी झाली. जोरदार वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांचे पत्रे उडून गेल्याच्या घटनाही घडल्या. 


शनिवारपर्यंत (ता.१७) विजेच्या कडकडाटासह मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्‍यता असल्याने महाराष्ट्र शासना आपत्ती व्यवस्थापनाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी जिल्ह्यांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.विजा पडण्याची शक्‍यता असल्याने लोकांनी घरा बाहेर पडू नये. तसेच मोठ्या पावसात कोणत्याही झाडाखाली उभे राहून नये, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात आल्या आहेत.
 

आजरा शहर, परिसरात मुसळधार 
आजरा : आजरा शहर व परिसरात मुसळधार पाऊस झाला. सायंकाळी पाच वाजता पावसाला सुरवात झाली. सुमारे तासभर पाऊस कोसळत होता. जोरदार पावसाने संभाजी चौक काही काळ जलमय झाला. पावसाच्या तडाख्याने कापणीस आलेली भात पिकाने शेतात लोळण घेतली आहे. सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाले असून सुगी कशी घरी न्यावयाची याची चिंता त्यांना लागून राहिली आहे.

राशिवडे, येळवडे परिसरात पाऊस 
राशिवडे बुद्रुक : आज पुन्हा पावसाने राशिवडे, येळवडे परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. सायंकाळी साडेचार वाजता आलेल्या धुवाधार पावसामुळे भात कापणी, मळणी मध्ये मोठी अडचण निर्माण झाली. अर्धा तास पाऊस झाला परंतु पाणीच पाणी झाले. 

पिंपळगाव परिसरात वादळी पाऊस
पिंपळगाव : पिंपळगाव परिसरात आज सलग तिसऱ्या दिवशी मेघगर्रजेनेसह जोरदार वादळी पाऊस झाला. दुपारनंतर आलेल्या पावसाने सुगीची कामे ठप्प झाली.विशेषतः भात कापणी कामे थांबली आहेत.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबई-हैदराबाद हायस्पीड ट्रेन नवी मुंबई विमानतळाला जोडणार! कसा असणार मार्ग? वाचा सविस्तर

Pune Crime : तरुणीशी संबंध तोडण्याच्या वादातून कात्रजमध्ये तरुणाची हत्या; दोन आरोपी फरार!

Prashant Jagatap Resignation : शरद पवारांच्या पक्षाला महापालिका निवडणुकीआधी पुण्यात मोठा धक्का; प्रशांत जगताप यांनी सोडलं शहाराध्यक्ष पद!

Jalgaon Municipal Elections : जळगावात 'नारीशक्ती'चा डंका! १८ पैकी १२ नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदी महिला विराजमान

Latest Marathi News Live Update : चाळीसगावात गोळीबार प्रकरणी चार आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT