कोल्हापूर

कोल्हापूर, सांगली महावितरणच्या 500 कर्मचार्‍यांचा सेवाभाव

तौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची मोठी हानी झाली

गणेश शिंदे

जयसिंगपूर : तौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणचे मोठे नुकसान झाले. विद्युत पोल, वाहिन्यांसह ट्रान्स्फॉर्मरचे मोठे नुकसान झाल्याने दोन्ही जिल्ह्यातील बराच भाग काळोखात आहे. चक्रीवादळाने दोन्ही जिल्ह्याचे एकाचवेळी नुकसान झाल्याने मनुष्यबळाची चणचण भासत होती. यावर कोल्हापूर आणि सांगली मंडळांतर्गत पाचशे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये धाव घेत जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सेवाभाव जपला आहे. कोल्हापूर, सांगलीकरांमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील विद्युत पुरवठा लवकरच सुरळीत होऊन उद्योग-व्यवसायांनाही गती मिळणार आहे.

तौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची मोठी हानी झाली. चक्रीवादळाने उद्योग, व्यापारासह सर्वच घटकांना याचा फटका बसला आहे. दोन्ही जिल्ह्यांसाठी हे चक्रीवादळ घातक ठरले. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महावितरणच्या पाचशे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या चार दिवसापासून चक्रीवादळाने जमीनदोस्त झालेले विद्युत पोल, लघुदाब वाहिन्यांसह ट्रान्स्फॉर्मरची कामे करुन विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

कोल्हापूर आणि सांगली परिमंडळातील सहाय्यक अभियंते, कनिष्ठ अभियंते, तंत्रज्ञ, प्रधान तंत्रज्ञ, वरीष्ठ आणि मुख्य तंत्रज्ञांकडून हे काम गतीमान करण्यात आले आहे. चक्रीवादळाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत केले असताना महावितरणची माणुसकी मदतीला धावल्याने दोन्ही जिल्ह्यातील महावितरणच्या कामांना गती आली असून लवकरच हे जिल्हे पुन्हा उभारी घेणार आहेत. शासकीय पातळीवर नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षांतील नेत्यांच्या दौर्‍यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्गातील नुकसानीची पाहणी करुन मदतीसाठी ग्वाही दिली आहे. महावितरणच्या कोल्हापूर, सांगली मंडळातील पाचशे अधिकारी, कर्मचार्‍यांनी कसल्याही कौतुकाची अपेक्षा न करता केवळ सेवाभाव जपत सर्वसामान्यांसह व्यापारी, व्यावसायिकांना नव्याने उभारी देण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

स्थानिकांची कृतज्ञता; भारावलेले कर्मचारी

चक्रीवादळाने जनजीवन विस्कळीत केले. शेती, घरांचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या डोकीवरील छतही वादळाने हिरावले. डोळ्यातील अश्रुंशिवाय काहीच उरले नसतानाही त्यांना पुन्हा जीवनचक्रात आणण्यासाठी महावितरणच्या कोल्हापूर आणि सांगलीतील कर्मचार्‍यांनी जीव तोडून मेहनत सुरु केल्याने स्थानिकांच्या डोळ्यात अश्रु दाटत असून त्यांच्या कृतज्ञतेने कर्मचारी भारावले आहेत.

"मालवण परिसरात सध्या दुरुस्तीची कामे युध्दपातळीवर सुरु आहेत. सोमवारनंतर मदत कार्यासाठी दुसरी तुकडी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहे. चक्रीवादळाने मोठे नुकसान केले असले तरी आम्ही सर्वजण मिळून लवरकच दोन्ही जिल्ह्यांतील वीज पुरवठा सुरळीत करु. यानंतर उद्योग, व्यावसायाची चक्रे गतीमान होऊन जनजीवन पूर्वपदावर येईल."

- सचिन कुडचे (वरीष्ठ तंत्रज्ञ, सांगली अर्बन)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News:बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी : नाईक

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT