Hi-Tech sandals will protect women 
कोल्हापूर

महिलांनो घाबरु नका, हे 'हायटेक सॅंडल्स' करणार तुमची सुरक्षा...

रमजान कराडे

नानीबाई चिखली (कोल्हापूर) - महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरून जाताना त्यांना असुरक्षितता जाणवते. त्यांची सुरक्षिततेची हीच गरज ओळखत कुरली (ता. निपाणी) येथील शिक्षक एस. एस. चौगुले यांनी ‘सेल्फ प्रोटेक्‍शन टेक्‍नॉलॉजी फॉर लेडीज’ हे नावीन्यपूर्ण सॅंडल्स बनविले आहे. त्यांच्या या उपकरणाची दखल दक्षिण भारत विज्ञान प्रदर्शनामध्ये घेऊन त्यांना सन्मानित केले.

रयत शिक्षण संस्थेच्या कुरली शाखेतील उपक्रमशील विज्ञान शिक्षक म्हणून चौगुले परििचत. त्यांनी नेहमीच संशोधक वृत्तीस चालना देताना विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक उपकरणांची निर्मिती केली. यावेळी त्यांनी बनविलेल्या नावीन्यपूर्ण उपकरणाची सर्वत्र चर्चा आहे. 

‘सेल्फ प्रोटेक्‍शन टेक्‍नॉलॉजी फॉर लेडीज’

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा विचार करीत यावेळी त्यांनी डिजीटल इंडिया विभागात विज्ञान, तंत्रज्ञान याचा वापर करीत टाकाऊ वस्तूपासून महिला, विद्यार्थिनींसाठी ‘सेल्फ प्रोटेक्‍शन टेक्‍नॉलॉजी फॉर लेडीज’ हे स्वसंरक्षण करणारे 
सॅंडल्स बनविले. सॅंडल्समध्ये त्यांनी जुना मोबाईल बसविला आहे. यामुळे महिला कोठेही असली तरी तिची माहिती यामधील मोबाइलवर मिळते. ज्यावेळी महिला अडचणीत असतील त्यावेळी याच्या माध्यमातून त्या घरी किंवा पोलिसांना संपर्क साधू शकतात. 

सॅंडल्सला दोन स्वीच...

या सॅंडल्समध्ये टाचेच्या बाजूस असलेला मोबाईल ब्लूटूथ, वायफायद्वारे जोडला आहे. यामध्ये दोन स्वीच असून एक बाजूस व दुसरा अंगठ्यासमोर स्वतंत्र बसवला आहे. जेव्हा महिला बाहेर जातील तेव्हा सॅंडल्समधील फोनवर घरातील व्यक्तीने मिस्ड कॉल द्यायचा. त्यांना कामावरून येण्यास उशीर झाला अगर एखादी व्यक्ती त्यांच्याशी गैरवर्तन करू लागली तर अंगठ्यासमोरील स्विच दाबायचा. त्यामुळे मिसकॉल दिलेल्या मोबाईलवर कॉल जातो. कॉल मिळाल्यानंतर घरातील व्यक्तीस जीपीएसव्दारे महिलेचे स्थान, अंतर समजते. त्यामुळे तत्काळ तिला मदत मिळते. 

महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबविण्यासाठी शासन स्तरावर प्रतिबंधात्मक उपाय शोधले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सॅंडल्सची संकल्पना मनात आली. संकल्पना प्रत्यक्षात उतरविल्यानंतर विज्ञान प्रदर्शनात त्याचे कौतुक झाले. याचा महिलांना फायदा झाला तर निश्‍चितच आनंद होईल. 
- एस. एस. चौगुले, विज्ञान शिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT