historic buildings forts forts open to tourists in kolhapur 
कोल्हापूर

Good News: ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, गड पर्यटकांसाठी खुले; लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत वाढ 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तु, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालये पर्यटकांसाठी आजपासून खुली करण्यात आली आहेत. तर, सध्या सुरु असलेले लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत. 

आदेशात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात विविध ऐतिहासिक वास्तुंचा वारसा आहे. विविध ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालयाला लाखो पर्यटक भेट देतात. पर्यटकांमुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे सुरु करावीत अशी वारंवार मागणी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून सर्व दुर्ग व ऐतिहासिक वास्तू खुले केले जात आहे. हे स्थळे खुली करत असताना संबंधीत विभागाने सर्व स्थळांवर आवश्‍यक ठिकाणी निर्जंतूकीकरण करावे लागणार आहे. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तिवर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही श्री देसाई यांनी दिला आहे.

 दरम्यान, जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. या निर्णयाचाही फायदा पर्यटकांसह कोल्हापूर जिल्ह्यालाही होणार आहे. 
 
लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत वाढ 
जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी सध्या सुरु असलेले लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी श्री देसाई यांनी तसे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा पूर्णपणे रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. यामध्ये लोकांनी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझरचा वापरही बंधनकारक केला आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sonsने चंद्रशेखरन यांना निवडलं, पण टाटा ट्रस्ट्सचा विरोध! नोएल टाटाच खरे किंगमेकर? टाटामध्ये चेअरमनची निवड कशी होते?

Jos Buttler: जॉस बटलरचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १५,००० धावा करणारा फलंदाज; विराट कोहली, रोहित शर्मा टॉप ५ मध्येही नाहीत

आम्ही कुठे जायचं? न्यायाधीशाचा प्रश्न; ५ महिन्यात २३ जणांना फाशीची शिक्षा, आता ९७ गंभीर खटले ट्रान्सफर होताच संतापले

गर्दीतून जात होती सलमान खानची कार, ड्रायव्हरच्या चूकीमुळे भाईजान चिडला, चालकाला जोरात मारलं अन्... Viral Video

Insulin Resistance Symptoms: डायबेटीस होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत; असं ओळखा तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही!

SCROLL FOR NEXT