history researcher Dr Jaysingrao Pawar home visit supriya sule kolhapur letest news
history researcher Dr Jaysingrao Pawar home visit supriya sule kolhapur letest news 
कोल्हापूर

"महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील नव्या पिढीनं कोल्हापूरचा इतिहास समजून घ्यायला हवा"

संदीप खांडेकर

कोल्हापूर : कोल्हापूर ऐतिहासिक शहर असून इथली सांस्कृतिक संपदा महत्त्वपूर्ण आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विविधांगी कार्याचा कोल्हापूरला मोठा वारसा आहे. तो केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला कळण्याकरिता त्याचे मार्केटिंग होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे व्यक्त केली.ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांची त्यांच्या सानेगुरुजी वसाहतीतील निवासस्थानी
 खासदार सुळे यांनी आज सकाळी सदिच्छा भेट घेतली. 

दीड तासांहून अधिक वेळ दोघांत विविध विषयांवर चर्चा झाली.
खासदार सुळे म्हणाल्या, "कोल्हापुरात मंदिरे, शाहूकालीन इमारती आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेली स्थळे कमी आहेत. कोल्हापूरचा इतिहास आजच्या पिढीला कळण्याची आवश्यकता आहे. प्रवासाच्या निमित्ताने परप्रांतीय कोल्हापुरात येत असतात. त्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करण्याकरिता योग्य पावले उचलावी लागतील. राजर्षी छत्रपती शाहू राजांनी विविधांगी कार्यातून कोल्हापूरच्या वैभवात मोलाची भर घातली. हे वैभव केवळ महाराष्ट्राला माहीत असून चालणार नाही ते देशाला समजण्यासाठी त्यादृष्टीने उपाय योजना आखाव्या लागतील.


त्या म्हणाल्या, "छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवतावादी व धर्मनिरपेक्ष होते. हा वारसा शालेय विद्यार्थ्यांपर्यंत जाण्यासाठी घेऊन नेमके काय करावे लागेल, यासंदर्भात निर्णय घ्यावा लागेल. समाजाच्या प्रबोधनासाठी तो आवश्यक आहे."
डॉ. पवार यांनी खासदार पवार यांना राजर्षी शाहू पंचखंडात्मक  राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ, छत्रपती राजाराम महाराज व सेनापती संताजी घोरपडे यांच्यावर आधारित पुस्तके भेट दिली. तत्पूर्वी, वसुधा पवार, डॉ. अरुंधती पवार, डॉ. मंजूश्री पवार, संयोगिता पवार यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी सुनील शिंदे,  शाहीर आझाद नायकवडी उपस्थित होते.

यावेळी माजी महापौर स‌ई खराडे, शिवतेज खराडे यांनी खासदार सुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सानेगुरुजी शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष सुधा जरग व रमेश चौगुले यांनी त्यांना वसाहतीतील ओपन स्पेस क्रमांक तीनमध्ये संरक्षित भिंत व सांस्कृतिक सभागृह बांधण्याकरिता खासदार फंडातून निधी उपलब्ध करावा, या मागणीचे निवेदन दिले. 

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT