hitting between three village in kolhapur district 
कोल्हापूर

त्यांचे जुळले प्रेम... अन् भिडले तीन गावचे ग्रामस्थ 

सकाळ वृत्तसेवा

कळे (कोल्हापूर) - काटेभोगावपैकी तळेवाडी (ता. पन्हाळा) येथे दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. दरम्यान, दगडफेकीत कळे पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल वैभव बापूसो खोत जखमी झाले. पडळ, सातार्डे, तळेवाडी व कोपार्डे येथील सतरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अटक केलेले संशयित असे ः विनायक लाड, सचिन रामाणे, रवींद्र रामाणे, सागर रामाणे, नितीन मिसाळ, दिगंबर पाटील, सचिन पाटील  (सर्व जण सातार्डे), बाबासाहेब चोपडे (पडळ), संदीप वाळवेकर, संतोष वाळवेकर, धनाजी वाळवेकर, श्रीधर चौगले, गणेश वाळवेकर, विलास वाळवेकर (तळेवाडी), परशराम विलास पाटील (कोपार्डे). कळे-खेरिवडे न्यायालयाचे न्यायाधीश विनोद खुळपे यांनी संशयितांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, भोगलेवाडी (ता. पन्हाळा) येथील मुलगा (नाव समजू शकले नाही) मामाकडे सातार्डे (ता. पन्हाळा) येथे ट्रॅक्‍टरवर कामाला होता. दरम्यान, तळेवाडी (ता. पन्हाळा) येथील त्याचा मित्र गणेश विलास वाळवेकर गवंडी कामासाठी सातार्डेत जात होता. दरम्यान, भोगलेवाडीतील मुलाचे सातार्डेतील एका अल्पवयीन मुलीशी प्रेम जुळले. 

ते दोघे मंगळवारी (ता. ४) पळून गेले. ते पळून जाण्यात गणेश वाळवेकरचा हात असल्याचा संशय मुलीच्या कुटुंबीयांना होता. त्यामुळे ते सर्वजण गणेशच्या घरी तळेवाडी येथे मंगळवारी रात्री आले. गणेशच्या कुटुंबीयांनी गणेशला लपवून ठेवले. पळून गेलेले दोघेजण कुठे आहेत, याची माहिती घेण्याचा प्रयत्न मुलीच्या कुटुंबीयांनी केला. यातून वाद वाढला. दरम्यान, गणेशच्या कोपार्डे (ता. करवीर) येथील नातेवाइकांना वादाची माहिती समजली. तेही तळेवाडीत आले. दरम्यान, वाद वाढल्याने कळे पोलिस ठाण्यात वादाची माहिती दिली. कॉन्स्टेबल वैभव खोत साथीदारांसह घटनास्थळी हजर झाले. तरुणांना समजावून सांगताना विलास दत्तू वाळवेकर याने (तळेवाडी) दगडफेक केली. यात खोत यांच्या डोक्‍याला दगड लागून ते जखमी झाले. दोन मोटारी (एमएच ०९ ईबी ००३८) व  (एमएच १२ ईटी ६८७८) ताब्यात घेतल्या आहेत. 
दगडफेक करून सरकारी कामात अडथळा आणल्याने कळे पोलिसांत खोत यांनी सतरा जणांविरोधात फिर्याद दिली. संशयितांना आज  कळे न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलिस कोठडी मिळाली. फिर्यादीतर्फे सरकारी वकील वर्षा माने-खोत यांनी काम पाहिले. पन्हाळ्याचे पोलिस निरीक्षक व कळे ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारलेले आंबरुष फडतारे तपास करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT