Home Guard with police nike arrested because taken bribe in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर - पोलिस नाईकसह होमगार्ड लाचलुचपतच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - तीन हजार रूपयांची लाच घेताना करवीर पोलिस ठाण्याच्या पोलिस नाईक आणि होमगार्डला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहात पकडले. दुसऱ्याच्या ताब्यात असलेली मोटर सायकल परत मिळवून देण्यासाठी बक्षीस म्हणून या रकमेची मागणी करण्यात होती. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम लाचलुचपत विभागात सुरू आहे. पोलिस नाईक दादाहरी अभिमन्यू बांगर (बक्कल नंबर 1212 रा. पोलिस मुख्यालय कसबा बावडा) आणि होमगार्ड प्रवीण लहू पाटील (वय 25, रा. कुरूकली, ता. करवीर) असे त्या दोघा संशयिताचे नाव आहे. 


 भोगावती येथे आज ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले. 

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती, करवीर पोलिस ठाण्यात पोलिस दादाहरी बांगर पोलिस नाईक म्हणून काम करतो. त्याच्याकडे भोगावती बीट सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तक्रारदार यांनी आपले वाहन दुसऱ्याने काढून घेतल्याची तक्रार पोलिसांच्या पोर्टलवर दिली होती. त्या तक्रार अर्जाची चौकशी ही करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक दादाहरी बांगरकडे देण्यात आली होती. त्याने याची चौकशी करून तक्रारदारांना हे वाहन संबधिताकडून परत मिळवून दिले. हे काम केल्याबद्दल बांगर आणि होमगार्ड प्रविण पाटील या दोघांनी तक्रारदारांकडे तीन हजार रुपये बक्षीस म्हणून लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. त्याची पडताळणी विभागाने केली. त्यानंतर आज सापळा रचला.

भोगावती येथे आज बांगर याच्यासाठी होमगार्ड पाटीलला तीन हजाराची लाच घेताला रंगेहात पकडले. त्यानंतर बांगरसह पाटील या दोघांना ताब्यात घेऊन याबाबतचा गुन्हा करवीर पोलिसात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलिस निरीक्षक युवराज सरनोबत, कर्मचारी मनोज खोत, शरद पोरे, नवनाथ कदम, मयूर देसाई यांनी केली. 

संपादन -धनाजी सुर्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : हिंजवडीमध्ये १८ तासांपासून बत्ती गूल

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT