The Home Quarantine Of 2958 People Ended In Ajara Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

आजऱ्यात 2958 जणांचे होम क्वारंटाईन संपले

सकाळवृत्तसेवा

आजरा ः आजरा तालुक्‍यात पुणे, मुंबई व परगावाहून 11 हजार 42 इतके जण आले होते. त्यांचे प्रशासनाने विलगीकरण केले होते. या पैकी 2 हजार 958 जणांचा अधीक्षयन कालावधी (होम क्वारंटाईन) संपला आहे. सध्या तालुक्‍यात 8 हजार 84 इतके होम क्वारंटाईन आहेत. त्यांच्यावर प्रशासनाची नजर आहे. यामध्ये आज नव्याने 12 जणांची भर पडली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या शहरात संचारबंदी टाईट करण्यात आल्यावर या भागातून तालुक्‍यात परतीचा ओघ सुरू झाला. या वीस दिवसात तालुक्‍यात 11 हजार 42 इतके जण परतले. त्यामुळे खेडोपाडी परतणाऱ्यांची मोठी वर्दळ वाढली होती. आरोग्य विभागाने पुणे, मुंबई व परगावाहून परतणाऱ्यांच्या हातावर शिक्के मारले आहेत. त्यांना होम क्वारंटाईन म्हणून घोषीत केले. त्यांनी घराच्या बाहेर पडू नये. कुटुंबापासूनही दूर रहावे, अशी सूचना केली.

यासाठी 14 दिवसांचा अधिक्षयन कालावधी दिला होता. यामध्ये 2 हजार 958 जणांचा कालावधी संपला आहे. सध्या तालुक्‍यात 8 हजार 84 इतके होम क्वारंटाईन आहेत. त्यांच्यावर प्रशासन नजर ठेवून आहे. परदेशातून आलेल्या 14 जणांचाही अधिक्षयन कालावधी संपला आहे. पण ते देखील आरोग्य विभागाच्या निरीक्षणाखाली आहेत. आज पुणे, मुंबई परिसरातून नव्याने 12 जण दाखल झाले आहेत. 

त्यांनी विशेष काळजी घ्यावी....! 
त्यां होम क्वारंटाईनचा अधिक्षयन काळ संपला आहे. पण त्यांनी स्वतःसह कुटुंब व समाजात मिसळताना विशेष काळजी घ्यावी. आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगीतले. 

सहा जणावर गुन्हे 
आजरा तालुक्‍यातील होम क्वारंटाईन असलेल्या सहा जणावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सहा जण प्रशासनाचे नियम मोडून गावात फिरत असलेले आढळले. त्यांना आजऱ्यात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 

Kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT