Honors for honesty Rickshaw driver Shivaji Krishnat Shinde 
कोल्हापूर

अर्ध्या तासाच्या अंतराने रिक्षात बॅग असल्याचे लक्षात आले अन्

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानकात पोचण्याच्या घाईत असणाऱ्या प्रवाशाची 25 हजारांहून अधिकची रोकड व किमती मोबाईल असलेली बॅग रिक्षात विसरली. रिक्षाचालक शिवाजी कृष्णात शिंदे यांनी ती शहर वाहतूक पोलिसांकडे दिली. पोलिसांनी प्रवाशाचा शोध घेऊन बॅग परत केली. वाहतूक पोलिसांसह संबंधित प्रवाशांनी शिंदे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सत्कार केला. 


मंगळवार पेठ पाटाकडील तालीम परिसरात शिवाजी शिंदे राहतात. त्यांची रिक्षा (एमएच 09 ईएल 0936) आहे. आज दुपारी ते आझाद चौकात रिक्षा थांब्यावर होते. तेवढ्यात त्यांच्या रिक्षात तुकाराम रामू मोठे हे प्रवासी घाईघाईत बसले. त्यांच्या हातात बॅग होती. त्यात 25 हजार 500 रुपये रोकड व 10 हजारांचा मोबाईल होता. त्यांनी रिक्षा मध्यवर्ती बसस्थानक येथे नेण्यास सांगितली. तेथे रिक्षा पोचल्यावर मोठे यांनी रिक्षाभाडे दिले आणि ते बसस्थानकाकडे निघून गेले. त्यात त्यांची बॅग रिक्षात विसरली.

अर्ध्या तासाच्या अंतराने रिक्षाचालक शिंदे यांना रिक्षात बॅग असल्याचे लक्षात आले. त्यांनी ही बॅग मध्यवर्ती बसस्थानक येथील ट्रॅफिक पोलिस चौकीत येथे कर्तव्यावर असणारे पोलिस नाईक संदीप निळपणकर यांच्याकडे प्रामाणिकपणे आणून दिली. त्यांनी संबंधित प्रवाशांचा शोध घेऊन त्यांना ही बॅग परत केली. त्यानंतर रिक्षाचालक शिंदे यांचा ट्रॅफिक पोलिस चौकीतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी निळपणकर यांच्यासह आयुब पेंढारी उपस्थित होते. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT