The hotel will start, but not enough staff 
कोल्हापूर

हॉटेल सुरू होणार, मात्र पुरेसे कर्मचारी नाहीत

मोहन मेस्त्री

कोल्हापूर : सहा महिन्यानंतर शासनाने हॉटेल चालू करण्यासाठी परवानगी दिली असली तरीदेखील वेटर व्यवस्थापन आणि किचन कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेशिवाय हॉटेल शंभर टक्के सुरू होणे अशक्‍य आहे. दरम्यान, ज्यांची रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्याची तयारी आहे. त्यांचे सोमवारी (ता.5) पासून व्यवसाय सुरू होतील. हॉटेल सुरू होणार असल्यामुळे खवय्ये कोल्हापूरकर मात्र काहीसे सुखावले आहेत. 
प्रशासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याकरिता बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. ग्राहक आणि कर्मचारी यांच्या आरोग्याबाबत सर्व दक्षता घेऊनच शहरातील हॉटेल व्यवसाय सुरू होतील, असा सूर आज हॉटेल मालक संघटनेच्या हॉटेल पॅव्हेलियन येथे झालेल्या बैठकीत उमटला. 
या बैठकीत आरोग्यविषयक सुरक्षिततेसाठी डॉक्‍टरांचेही मार्गदर्शन घेण्यात आले. वेटर आणि किचनमधील कर्मचाऱ्यांनी फेस शिल्ड, मास्क वापर करावा आणि दर तीन तासांनी संपूर्ण हॉटेलचे सॅनिटायझेशन करावे, दिवसातून तीन वेळा कर्मचाऱ्यांचा ताप आणि ऑक्‍सिजन पातळी तपासणी गरजेची असल्याचे डॉ. रूपाली कपाले यांनी सांगितले. शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टंन्सचा अवलंब करण्यासाठी रेस्टॉरंटमधील फर्निचर व्यवस्थेमध्ये बदल करावा लागणार असल्याने बार आणि रेस्टॉरंट चालू करण्यात वेळ लागणार असल्याचे अनेक व्यावसायिकांनी सांगितले. तसेच अनेकांचे हॉटेल कामगार गावी गेले आहेत. ते परतल्याशिवाय पूर्ण क्षमतेने व्यवसाय सुरू करणे अशक्‍य आहे, असे काही व्यावसायिकांनी सांगितले. 
या बैठकीस उज्ज्वल नागेशकर, सचिन शानबाग, आशिष रायबागे, मोहन पाटील, अरुण चोपदार, सिध्दार्थ लाटकर, आनंद माने, बाबा जगदाळे आदिंसह शहरातील अनेक हॉटेल व्यवसायिक उपस्थित होते. 

या नियमांचे पालन करावे लागणार 
-सर्व ग्राहकांच्या शरीराचे तापमान तपासणे, 
- तापमान 100 पेक्षा जास्त असेल तर प्रवेश नाकारावा, 
- हॅड सॅनिटायझरचा वापर सतत करावा, 
-बुफे जेवणास परवानगी नाही 
- वेटरना मास्क फेसशिल्ड असावेत, 
- दोन टेबलमध्ये एक मीटरचे अंतर असावे, 
सीसीटिव्ही चालू असणे बंधनकारक आहे

-संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhai Jagtap show cause notice : महापालिका निवडणुकीतील अपयशानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उघड; भाई जगताप यांना 'शोकॉज' नोटीस!

हा, तर वैभव सूर्यवंशीवर वरचढ ठरला! U19 World Cup मध्ये विश्विविक्रम नोंदवला; १९२ धावांची खेळी अन् ३२८ धावांची विक्रमी भागीदारी

Latest Marathi News Live Update: ''कमिशनखोरी खपवून घेणार नाही'' फडणवीसांचा नगरसेवकांना इशारा

Crime: म्हशीला दरवाजासमोरून नेऊ नका... पत्नीची विनंती, पण पतीचा पारा चढला, रागाच्या भरात धक्कादायक कृत्य, काय घडलं?

BMC Election: मुंबई महापालिकेत अमराठी चेहऱ्यांचा भरणा! पाच-दहा नव्हे तब्बल 'इतके' जण विजयी

SCROLL FOR NEXT