Housing societies should be cowardly warriors, providing treatment for empty flat patients 
कोल्हापूर

गृहनिर्माण सोसायट्यांनी कोविड योद्धे व्हावे, रिकामे फ्लॅट रुग्णांसाठी उपचारास द्यावे

निवास चौगले


कोल्हापूर ः जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग वाढत असून बाधित रुग्णांना ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांनाही काही प्रमाणात मर्यादा येत आहेत. अशा परिस्थितीत रिकामे फ्लॅट असलेल्या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी आता पुढे येण्याची गरज आहे. त्या सोसायटीतील बाधित झालेल्या रुग्णांना त्याच परिसरात अलगीकरण करता येईल, अशी सोय आता निर्माण करण्याची गरज आहे. 
गेल्या पंधरा दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढत आहे. या रुग्णांना आतापर्यंत छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात, इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयात, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व काही खासगी रुग्णालयात ठेवले जात आहे. जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढल्याने ही सर्व रुग्णालये फुल्ल झाली आहेत. सीपीआरमध्ये तर 200 खाटांची व्यवस्था असताना सध्या 272 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशीच स्थिती अन्य रुग्णालयांची आहे. दुसरीकडे कोरोनावर उपचार करणाऱ्या काही खासगी हॉस्पिटलना स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्यातून एका हॉस्पिटलवर दगडफेकही झाली. त्यामुळे खासगी रुग्णालयात जागा असूनही लोकांच्या विरोधामुळे डॉक्‍टर असे रुग्ण घ्यायला तयार होत नाही. 
सीपीआरमध्ये तर काल बेड न मिळाल्याने एका वृद्धाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. प्रशासनाच्या पातळीवर अलगीकरण कक्ष व कोविड सेंटर निर्मितीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत; पण रुग्णवाढीच्या तुलनेत ही संख्याही भविष्यात कमी पडण्याची शक्‍यता आहे. अजून काही दिवस अशीच परिस्थिती राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे. अशा परिस्थितीत शहर व परिसरातील मोठ्या हौसिंग सोसायट्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. अशा सोसायट्यांत अनेक फ्लॅट विविध कारणांनी रिकामे आहेत. हेच फ्लॅट पॉझिटिव्ह किंवा संशयित रुग्णासाठी देण्याची गरज आहे. त्याच सोसायटीत राहणाऱ्या लोकांसाठी ही चांगली सोय होईल, त्यादृष्टीने या सोसायट्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. 

रुग्णामागे अनुदान ही अफवाच 
प्रत्येक कोरोना रुग्णासाठी केंद्र सरकार महापालिका, नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेला काही अनुदान देणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. प्रत्यक्षात असे कोणतेही अनुदान मिळणार नाही. सरकारी रुग्णालयात मोफत उपचार होतील. राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतूनही यावर उपचार होतील; पण त्यासाठी अटी व शर्थी वेगळ्या आहेत. त्यामुळे रुग्णामागे अनुदान ही अफवाच आहे. 

"हिराश्री लेक'चा आदर्श 
रंकाळा परिसरातील हिराश्री लेक या गृह प्रकल्पात त्या सोसायटीतील रुग्ण बाधित झाल्यास त्याच परिसरात त्याच्यावर उपचार करण्यास सोसायटीत राहणाऱ्या लोकांनी मान्यता दिली आहे. एका बाजूला कोरोना रुग्ण सापडल्यानंतर भागाभागात त्या कुटुंबावरच बहिष्कार घालण्याचे प्रकार सुरू असताना हिराश्री लेक या प्रकल्पाने वेगळा आदर्श लोकांसमोर ठेवला आहे. त्याचे अनुकरण इतर सोसायटीत होण्याची गरज आहे.
 

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

Darvha News : नितेश राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; दारव्हा तालुक्यात ठाकरेसेनेची घोषणाबाजी; मच्छीमारांना मदत जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

LPG Rule: उत्तर प्रदेशमध्ये 1200 कुटुंबांचा गॅस पुरवठा रोखला; 413 कुटुंबांचे कनेक्शन तोडले, नेमकं कारण काय?

'दृश्यम ३' थिएटर गाजवतोय पण ओटीटीवर अचानक ट्रेंड होतोय अजय देवगनचा ११ वर्ष जुना चित्रपट; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT