How to draw the next four months? 
कोल्हापूर

पुढचे चार महिने कसे काढायचे ? विशाळगडवासियांसमोर प्रश्‍न 

दिग्विजय कुंभार

आंबा : कोरोनाच्या संकटामुळे अडीच महिन्यांपासून विशाळगडचे पर्यटन व धार्मिक स्थळ बंद आहे. ऐन हंगामात सर्व व्यवहार बंद राहिल्यामुळे शंभरहून अधिक व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे. उत्पन्नाचीच साधने बंद झाल्यामुळे पावसाळ्याचे चार महिने कसे घालवायचे ? हा प्रश्‍न विशाळगडवासींयासमोर पडला आहे. 

कोरोनामुळे गडावरील हॉटेल्स, पानपट्टी, कोल्ड्रींक्‍स, हमाली, पार्कींग, ग्रामपंचायत कर, दर्गा पुजारी, यात्री निवास पूर्णतः बंद आहे. पर्यायाने व्यावसायिकांचे दिवसाकाठचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गडावर दुकान माल, इमारत साहित्य, पर्यटक ओझी वाहून नेणे अशी हमाली करणाऱ्या गजापूर परिसरातील सुमारे शंभर हमालांच्या उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले आहे. त्यांचा दिवसाकाठचा पंचवीस हजार रुपयांचा रोजगार बुडाला आहे. 

एप्रिल व मे महिन्यात पर्यटनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातूनच पावसाळ्यातील पुढचे चार महिने घर चालवावे लागते. त्यामुळे पर्यटन सुरु होईपर्यंत येथील लोकांना उपासमारीला सामोरे जावे लागणार आहे. पर्यटक नसल्याने व लोकांच्या हातात पैसा नसल्यामुळे गडावर अत्यावश्‍यक सेवेची दुकाने उघडूनही फायदा नाही. गडावर बॅंक बॅलन्स असणारी दोन ते तीन टक्के लोक सोडले तर उर्वरितांना मात्र कसेबसे दिवस काढावे लागत आहेत. 

विशाळगड शाबूत... 
अठरा मार्च पूर्वी गडावर मुंबईसह अन्य भागातील पर्यटक होते. संकटाचे गांभीर्य ओळखून दक्षता कमिटीने त्यांना अठरा मार्चलाच गड उतार केले. गडाच्या पायथ्याशी गजापूर येथील चाकरमान्यांत कोरोनाचा फैलाव झाला. परंतु आतापर्यंत गडावर कोरोनाचे आक्रमण न झाल्याने गड कोरोनापासून शाबूत राहीला आहे. 

कोरोनामुळे पर्यटन व धार्मिक स्थळ बंद राहिल्याने सर्वांचीच उदरनिर्वाहाची साधने लॉकडाऊन झाली आहेत. सरकारने गडवासीयांना आर्थिक मदत द्यावी. नियम व अटींसह येथील पर्यटन सुरु करावे. 
- बंडू भोसले, संस्थापक, शिवाजी तरुण मंडळ विशाळगड 


दृष्टिक्षेप 
- पर्यटन हंगामाचा एप्रिल-मे महिना वाया 
- चार महिने पावसाळ्यात पर्यटन ठप्प असते 
- पर्यटनावर अवलंबून व्यावसायिक अडचणीत 
- शंभरावर हमालांचे उदरनिर्वाहाचे साधनच बंद 

कोल्हापूर

कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

POR vs CRO Live: ख्रिस्तियानो रोनाल्डोने इतिहास रचला! चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून गेला, Video Viral

T20 World Cup : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल खेळणार; दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत दारूण पराभव

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

SCROLL FOR NEXT