How long did the elephant have to endure? 
कोल्हापूर

सांगा आम्हाला या काळाचं किती काळ सोसायचं

रणजित कालेकर

आजरा ः सोहाळे (ता. आजरा) परिसरात गेले दोन दिवस टस्कर धुमाकूळ घालत आहे. येथील मारुती विश्‍वास कळेकर व धोंडीबा विश्‍वास कळेकर यांच्या सुलगाव हद्दीतील रांगी नावाच्या शेतातील 30 गुंठे भाताचे पीक फस्त करून टाकले आहे. यामध्ये कळेकर बंधूंचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 
चाळोबा जंगलात तळ ठोकून असलेला टस्कर दोन दिवसांपासून सोहाळे परिसरात आला आहे. रामतीर्थ व सुलगाव येथील राजाराम पॉईंट जवळ त्याचा वावर आहे. आज पहाटे टस्कराने रांगी नावाच्या शेतातील कळेकर यांच्या शेतात धुमाकूळ घातला. पोटरीला आलेल्या भाताचे नुकसान केले आहे. टस्कराने पीक तुडवून टाकले असून कळेकर बंधूंचे सुमारे पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेली पीक टस्कर उद्‌ध्वस्त करीत असल्याने शेतकरी हवालदिल आहे. वनविभागाने त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

गवसे येथेही धुडगूस 
सोहाळे परिसरात टस्कर धुमाकूळ घालत असताना दुसरा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात गवसे परिसरात धुडगूस घालत आहे. दोन्ही टस्करामुळे शेतकरी त्रस्त झाले असून त्यांना आवरायचे कसे असा प्रश्‍न वनविभागासमोर आहे. कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर

संपादन ः रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील आरोग्य विभागात ५,२२३ नव्या पदांची मेगाभरती! अनेक जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्ये जागा भरणार; कुठे आणि कधी?

समृद्धी महामार्ग ते दक्षिण मुंबई प्रवास सुपरफास्ट होणार! MSRDCच्या नव्या लिंक रोडमुळे प्रवासाचं चित्र बदलणार; कसा आहे मार्ग?

Asian U-15 Bronze: थायलंडमधील आशियाई कुस्ती स्पर्धेत कऱ्हाडची अंजली वेताळ चमकली; १५ वर्षाखालील गटात भारताला कांस्यपदक

'दुपारी १.११ वाजता बॉम्बस्फोट'... विधानभवनाला धमकीचा ई-मेल, सुरक्षा यंत्रणांची धावपळ

India Women Team Olympics 2028: भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑलिम्पिकचं तिकीट पक्कं केलं; पुरुष संघाचं काय?

SCROLL FOR NEXT