How many people were at the funeral? Who gave a shit?  
कोल्हापूर

अंत्ययात्रेत किती जण होते? कोणी खांदा दिला? शोध सुरू 

डॅनियल काळे

कोल्हापूर : गंजीमाळ येथील एका माजी नगरसेवकाच्या आईचा मृत्यू गुरुवारी झाला होता. अंत्ययात्रेला गर्दी होती. तथापि या वृद्धेचा अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आल्याने गंजीमाळसह परिसर हादरून गेला. अंत्यविधीला गर्दी होती. यामध्ये किती लोक सहभागी होते ?, कोणी खांदा दिला ?, आदीची माहिती प्रशासन घेत असून 40 हून अधिक जणांना क्वारंटाईन केले आहे. 

गंजीमाळ येथील माजी नगरसेवकाच्या आईला न्यूमोनियाचा त्रास होता. खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्‍टरांनी वृद्धेत कोरोनाची लक्षणे असल्याचे नातेवाईकांना सांगितले. तसेच, खासगी तपासणी केंद्रातही स्वॅब घेतला. त्यानंतर काही वेळातच वृद्धेचा मृत्यू झाला. महिलेचा मुलगा माजी नगरसेवक असल्याने परिसरात चांगले राजकीय वलय आहे. त्यामुळे अंत्यविधीला गर्दी झाली. आज स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच गंजीमाळ परिसरात एकच खळबळ उडाली. एकमेकाला फोन करत अहवालाची माहिती घेतली. 

महापलिकेच्या यंत्रणेला माहिती मिळताच प्रशासनाने कोण संपर्कात आले, त्याची माहिती घ्यायला सुरवात केली. अंत्यविधी तयारी कोणी केली. मृतदेहाचा कोणाशी संपर्क आला. खांदे देणारे कोण आहेत, याची सर्व माहिती प्रशासनाने घेत पहिल्या टप्प्यात 40 लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू केली. तपासणीनंतर या लोकांना क्वारंटाइन केले आहे. 

दृष्टिक्षेप 
- माझी नगरसेवकाच्या आईचा मृत्यू 
- मृत्यू नंतर अहवाल आला पॉझिटिव्ह 
- 40 हून अधिक नागरिक क्वारंटाईन 
- नागरिकांनी एकमेकाला फोन करून घेतली अहवालाची माहिती 


संपादन : प्रफुल्ल सुतार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT