kolhapur sakal
कोल्हापूर

कोणी कितीही दिशाभूल करुदे मुंबईतील जमीन फायद्याचीच!

अरुण डोंगळे यांचा विश्‍वास; चुयेकरांवर झाली होती टीका

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोणी कितीही दिशाभूल करू देत; पण पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने ‘गोकुळ’साठी मुंबई, वाशी व भोकरपाडा येथे घेतली जाणारी जमीन शेतकऱ्यांच मालकीची राहील. त्यातून संघाची भरभराट होण्यास निश्‍चित मदत होईल असा विश्‍वास ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी व्यक्त केला. गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी ते बोलत होते.

डोंगळे म्हणाले, ‘‘एन.डी.डी.बीचे कर्ज ३२ कोटीचे आहे. त्याची परतफेडीची मुदत दोन वर्षाची आहे. कोणी तरी दिशाभूल करण्यासाठी १५० ते १७५ कोटींचे कर्ज असल्याचे चुकीचे सांगत आहे. माजी अध्यक्ष आनंदराव पाटील-चुयेकर गोकुळ शिरगावची जागा घेतानाही लोकांनी विरोध करत १५ एकर जागा कशासाठी अशी विचारणी केली; पण चुयेकर यांनी कोणाचेही न ऐकता १५ एकर जागा घेतली. पशुखाद्यासाठी जागा घेतानाही विरोध झाला. आज ही जागाही गोकुळला कमी पडत आहे. भविष्याच्या विचार करता, सरकारी दरात ऐवढी जमिन मिळाली नसती.’’

कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर म्हणाले, ‘‘गोकुळचे संकलन चौदा लाखांपर्यंत आहे. ते २० लाखापर्यंत जाईल. गोकुळ दुधाला बाहेर प्रचंड मागणी आहे. अशावेळेला आतापासूनच नियोजन केले पाहिजे. मुंबई, वाशी व भोकरपाडा येथे जमिन घेत आहे. संचालक मंडळाने दूध उत्पादकांच्या हितासाठी हा धाडसी निर्णय घेतला आहे. काहीही झाले तर हे काम करायचे आहे. यामध्ये शासनाची जमिन कमी दरात मिळण्यासाठी पालकमंत्री पाटील व ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्यामुळे मदत झाली आहे. खासगीमध्ये ही जमीन खरेदी केली तर यापेक्षा वीस पट आपल्याला पैसे द्यावे लागतील.’’

छोटी डेअर उभारणार

मुंबईमध्ये आपण छोटी डेअरीच उभाणार आहोत. यामुळे दह्याचे पॅंकिंग करता येणार आहे. आपण स्वाभिमानाने आपले पॅकिंग करता येणार आहे. कोणाला त्यासाठी पैसे मोजावे लागणार नसल्याचेही श्री घाणेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice President Election Update: मोठी बातमी! उपराष्ट्रपती पदाबाबतचा निर्णय, पंतप्रधान मोदी अन् जे.पी.नड्डा घेणार; 'NDA' बैठकीत ठराव

Putin Visit to India: भारत-अमेरिका 'ट्रेड वॉर' सुरू असताना, चार वर्षानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन येताय दिल्लीत!

Sanju Samson : मोठी बातमी! संजू सॅमसन CSK त जाण्याच्या तयारीत...संघ व्यवस्थापनाकडे केली 'ही' मागणी; राजस्थानच्या रॉयल्सच्या गोटात नेमकं काय शिजतंय?

Viral Video: सोंडेत धरला ब्रश अन् हत्तीनेच काढलं हत्तीचं चित्र; जराही रेष इकडे-तिकडे नाही, सोशल मीडियात हुशार हत्तीचं होतंय कौतुक

Latest Maharashtra News Updates: नारळी पौर्णिमेच्या सुट्टीमुळे परीक्षा अचानक रद्द

SCROLL FOR NEXT