HRCT in the district Fixed two, two and a half thousand test rates 
कोल्हापूर

कोल्हापूर : राज्य शासनाने एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्‍चित केले असून त्यानुसार 16पर्यंत स्लाईसच्या मशीनवर चाचणीकरीता दोन हजार रुपये, 16 ते 64 स्लाईसच्या मशीनवरील चाचणीकरिता अडीच हजार रुपये आणि 64 ते 256 स्लाईसच्या मशीनवरील चाचणीसाठी तीन हजार रुपये असे दर

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : राज्य शासनाने एच.आर.सी.टी. चाचणीचे दर निश्‍चित केले असून त्यानुसार 16पर्यंत स्लाईसच्या मशीनवर चाचणीकरीता दोन हजार रुपये, 16 ते 64 स्लाईसच्या मशीनवरील चाचणीकरिता अडीच हजार रुपये आणि 64 ते 256 स्लाईसच्या मशीनवरील चाचणीसाठी तीन हजार रुपये असे दर निश्‍चित केले आहेत. 
कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी एच.आर.सी.टी.चाचणीचे दर निश्‍चित करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने राज्यातील विविध खाजगी रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांशी समन्वय साधून हे दर निश्‍चिती केली आहे. यामध्ये सी.टी.स्कॅन तपासणी, तपासणी अहवाल सी.टी.फिल्म,पी.पी.ई. किट, डिसइन्फेक्‍टंट, सॅनिटायझेशन चार्जेस व जी.एस.टी. चा समावेश आहे. 
एच.आर.सी.टी तपासणी केल्यानंतर अहवालावर कोणत्या सी.टी. मशिन्सद्वारे तपासणी केली आहे, ते नमूद करणे बंधनकारक असेल. 
डॉक्‍टरच्या प्रिस्क्रीप्शन्स शिवाय एच.आर.सी.टी करण्याची मागणी नागरीकांडून करण्यात येते. या तपासणीमध्ये किरणोत्सर्जनद्वारे तपासणी असल्याने जोखीम असते. यासाठी नोंदणीकृत डॉक्‍टरांच्या प्रिस्क्रीप्शन्स शिवाय ही तपासणी करु नये. एच.आर.सी.टी तपासणी करणाऱ्या रेडीओलॉजिस्टने संपूर्ण तपासणी अहवाल देणे आवश्‍यक राहील. ज्या रुग्णांकडे आरोग्य विमा योजना आहे किंवा एखादया रुग्णालयाने किंवा कार्पोरेट-खाजगी आस्थापनेने जर एच.आर.सी.टी तपासणी केंद्राशी सामंजस्य करार केलेला असेल त्यासाठी उपरोक्त दर लागू राहणार नाहीत. 

जिल्हाधिकारी, आयुक्त सक्षम प्राधिकारी 
एच.आर.सी.टी तपासणीसाठी निश्‍चित केलेले दर (मशिनच्या प्रकारानुसार) दर्शनी भागात लावावे लागणार आहेत. निश्‍चित दरापेक्षा अधिक दर आकारणी केल्यास संबंधितावर कारवाई होणार आहे. यासाठी राज्य स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य आरोग्य हमी सोसायटी व जिल्हा स्तरावर (महानगरपालिका क्षेत्र वगळून) संबंधित जिल्हाधिकारी व संबंधित महानगरपालिका क्षेत्रात संबंधित महानगरपालिका आयुक्त सक्षम प्राधिकारी राहतील. ही दर आकारणी साथरोग कायदयांची अंमलबजावणी असेपर्यंत चालू राहतील.

संपादन - य़शवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT