कोल्हापूर : "सकाळ' माध्यम समूहाच्या पुढाकाराने स्त्री सन्मानार्थ शनिवारी (ता. 7) "चला, दामिनी होवू या' मानवी साखळीचे आयोजन केले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विविध महिला संस्था, संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.
ऐतिहासिक बिंदू चौकात सकाळी आठ वाजता ही सारी मंडळी एकवटणार असून त्यानंतर एकमेकांचे हात हातात गुंफून निर्भय बनण्याचा वज्रनिर्धार करणार आहेत.
यंदाच्या महिला दिनाच्या पार्श्वभुमीवर हा उपक्रम होणार आहे. यावेळी शाहिरा दीप्ती सावंत व शाहिरा तृप्ती सावंत स्त्री सन्मानाची मशाल मनामनांत पेटवणार आहेत. एव्हरेस्ट मोहिमेसाठी जय्यत तयारी करणारी आणि लवकरच मोहिमेला प्रारंभ करणारी करवीरकन्या कस्तुरी सावेकर यावेळी सर्व मुली व महिलांना निर्भय होवून दामिनी बनण्याची शपथ देणार आहे.
बिंदू चौकात सकाळी आठपासून मुली व महिला एकवटतील. साडेआठला त्या एकमेकांच्या हातात हात गुंफतील आणि मानवी साखळी करतील. त्यानंतर पुन्हा साऱ्याजणी निर्भय बनण्याची शपथ घेतील. महिला सन्मानार्थ विविध घोषवाक्ये, पोस्टर्स, फलक घेवून विविध महिला संस्था, संघटनाही सहभागी होणार आहेत.
आमचा असेल सहभाग...
- निर्भया पथक, महिला पोलिस, व्हाईट आर्मी, जिजाऊ ब्रिगेड, शासकीय महिला संघटना, एनसीसी छात्र, महिला वकील संघटना, अंगणवाडी सेविका, सायबर-वुमेन्स कॉलेज, कमला कॉलेज, शहाजी कॉलेज, गार्डन्स क्लब, अवनि-एकटी संस्था, उडान मंच, स्वयंसिध्दा, चाईल्डलाईन, कॉमर्स कॉलेज, गोखले कॉलेज, रग्बी खेळाडू संघटना, पारिचारिका संघटना, महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियन, आनंदीबाई महिला संस्था, इनरव्हील क्लब.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.