Human testing for covacin vaccine ends 
कोल्हापूर

कोव्हॅक्‍सीन लशीची मानवी चाचणी महिनाअखेरला 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - कोविड-19 च्या पार्श्‍वभूमीवर कोव्हॅक्‍सीन लस निर्मितीसाठी तिसऱ्या टप्प्याची मानवी चाचणी या महिन्यांत तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात सुरु केली जाणार आहे. पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. दुसऱ्या टप्प्यामधील चाचणी सुरु असून, पुढील आठवड्यात चाचणी पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरवात होणार आहे. 

बेळगाव शहरातील जीवनरेखा रुग्णालयात चाचणी सुरु आहे. बेळगावसह राज्यातील सुमारे अडीचशे जणांवर या कंपनीतर्फे मानवी चाचणी सुरु असून, देशात सुमारे तीस हजार जणांवर उपचार सुरु आहेत. कोव्हॅक्‍सीनची दुसऱ्या टप्प्याची चाचणी पूर्ण झाली आहे. सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पण, अजून पूर्ण चाचणी झाली नाही. पुढील आठवड्यात प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्याची मानवी चाचणी सुरु केली जाईल. ऑक्‍टोबर महिन्यांत तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात चाचणीला सुरवात केली जाण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती आहे. 

हैद्राबाद येथील भारत बायोटेक कंपनीतर्फे कोव्हॅक्‍सीन औषधाची निर्मिती केली जात आहे. कंपनीतर्फे पहिल्या टप्प्याची चाचणी पूर्ण झाली असून, दुसऱ्या टप्प्याची चाचणी सुरु होणार आहे. मानवी चाचणीसाठी पुढे येऊन लस घेणाऱ्यांना तपशिल वेळोवळी घेऊन कंपनीकडे पाठविला जातो. त्यानंतर ऍन्टीबॉडीज तयार झालेली आहे का? रोग प्रतिकार शक्ती कितपत तयार झाली आहे, त्याची माहिती वेळोवेळी घेतली जाते. दोन टप्पे यशस्वी पार पडल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी हाती घेण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी सुमारे अडीचशे लोक निवडले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे वैशिष्ठ म्हणजे यात काही मधुमेहींचा समावेश करण्याची तयारी सुरु आहे. मानवी चाचणीसाठी स्थानिकांना प्राध्यान्य दिले जाते. त्यामागे लस घेणाऱ्या व्यक्तीशी बातचीत करणे, त्याच्या आरोग्याची वेळोवेळी चाचणी करणे आणि लसीचे काय परिणाम होत आहेत, त्याची माहिती घेणे सुलभ ठरते. तिसऱ्या टप्यात बेळगाव आणि धारवाड जिल्ह्यातील लोक चाचणीसाठी निवडले जात आहेत. 

झायडस कॅडिला 
बेळगाव जिल्ह्यात कोविडवर झायडस कॅडिला कंपनीतर्फेही लस निर्मितीसाठी मानवी चाचणी सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यात चाचणी सुरु झाली असून, 175 जणांना लस देण्यात आली आहे. पण, त्याचा आढावा घेतला जात आहे. लस घेतलेल्यांची आरोग्य तपासणी सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही म्हणजे तिसऱ्या टप्प्याची चाचणी केली जाईल. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; जगभरात फक्त 200 प्रकरणांमध्ये नोंद, काय म्हणाले डॉक्टर?

Latest Marathi News Live Update : महायुती सरकारचा 'आनंदाचा शिधा' बंद शक्यता, कारण काय?

Solapur News: 'मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या जमीनदोस्त'; महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक, मंडई विभागाची संयुक्त कारवाई

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

SCROLL FOR NEXT