Humiliation of relatives by doctors; Pictures of several hospitals 
कोल्हापूर

डॉक्‍टरांकडून नातेवाईकांचा पाणउतारा ; अनेक दवाखान्यातील चित्र

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात कोरोनामुळे मृत्यूशी झुंज देणारा रुग्ण आणि त्याच्या काळजीत रुग्णालयाबाहेर थांबलेले नातेवाईक असे चित्र बहुंताशी रुग्णालयाच्या दारात आहेत. यात डॉक्‍टरांकडून दिली जाणारी उत्तरे, माहिती विचारल्यानंतर केला जाणारा पाणउतारा आणि अगदीच वाद आणि जाब विचारण्याचे प्रकार झाले तर रुग्णाला आमच्यातून हलवा, अशी थेट दिली जाणारी धमकी यामुळे रूग्णाच्या नातेवाईकांना त्रास होत आहे. 
कोरोनाग्रस्तांवर स्वतंत्र आयसोलेटेड वॉर्डात उपचार केले जातात. या वॉर्डात केवळ संबंधित डॉक्‍टर किंवा त्यांच्या परिचारिका यांना प्रवेश दिला जातो. नातेवाइकांना रुग्णाला भेटता येत नाही. त्यामुळे गंभीर असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची दिवसभर घालमेल सुरू असते. आपल्या रुग्णाची तब्बेत कशी असेल, धोका टळला असेल काय? अजून किती दिवस रुग्णालयात ठेवावे लागेल? यासारख्या प्रश्‍नांबरोबरच रुग्णालयाचे बिल हा सर्वात मोठा प्रश्‍न नातेवाइकांसमोर असतो. अशा परिस्थितीत डॉक्‍टरांनी किमान रुग्णाच्या प्रकृतीची माहिती व्यवस्थित देण्याबरोबरच या प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत, अशी अपेक्षा नातवाइकांची असते, 
पण काही डॉक्‍टरांकडूनच नातवाइकांच्या या अपेक्षांवर पाणी ओतले जात आहे. प्रश्‍न विचारला तर नातेवाइकांवर खेकसले जाते, इंजेक्‍शन आम्हाला बाहेर मिळतात आणू का? असे विचारले तर त्यांचा अपमान केला जातो. अगदीच चिकित्सक काही विचारले तर थेट रुग्णाला अन्यत्र घेऊन जावा, असा धमकीवजा इशाराच डॉक्‍टरांकडून दिला जातो. यावर कहर म्हणजे रुग्णावर व्यवस्थित उपचार व्हावेत, यासाठी काही नातेवाईक आमदार, मंत्री यांना डॉक्‍टरांना फोन करायला लावतात. अशा नातेवाइकांचा तर डॉक्‍टरांकडून पाणउताराच केला जातो. 
यापेक्षा आणखी कोण मोठा असेल तर त्यांनाच फोन करायला लावा, असे सांगत संबंधितांचा अपमानच केला जातो. अशा फोनचा त्रास नको म्हणून काही डॉक्‍टरांनी मोबाईल अन्य क्रमांकावर वळवून ठेवले आहेत. आपला रुग्ण डॉक्‍टरांच्या ताब्यात असल्याने नातवाइकही संयम ठेवून या सगळ्या प्रकाराला सामोरे जात आहेत. 

बेड मिळवताना यातायात 
कोल्हापूरला लागून असलेल्या जिल्ह्यातील अनेक रुग्णांवर सध्या शहरातील काही खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. बाहेरून येणाऱ्या अशा रुग्णांनाच डॉक्‍टर प्राधान्य देतात. स्थानिक रुग्णाला दाखल केले तर त्यांच्याकडून येणारे नेत्यांचे फोन, वारंवार होणारी चौकशी याचा त्रास नको म्हणून स्थानिक रुग्णांना बेडच द्यायचा नाही, असेच काही डॉक्‍टरांनी ठरवले आहे. त्यामुळे शहरातील रुग्णांना बेड मिळवतानाच यातायात करावी लागत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT