Hupri police take action to stop smugglers of unlicensed bicyclists in the city today 
कोल्हापूर

ते खिशात औषधाच्या चिठ्ठ्या आणि गोळ्या टाकून गाडीवर फिरत होते मग पोलिसांनी केले असे...  

बाळासाहेब कांबळे

हुपरी (कोल्हापूर) - कोरोना विषाणु संसर्ग टाळण्यासाठी प्रशासना तर्फे आटोकाट प्रयत्न केले जात आहेत पण याचे गांभीर्य लक्षात न घेता शहरात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांच्या मुसक्या आवळण्याची धडक कारवाई हुपरी पोलीसांनी आज केली. सकाळी अकराच्या सुमारास अवघ्या पाऊण तासात पोलीसांनी सुमारे पन्नासहून अधिक दुचाकीस्वारांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या कारवाई बद्दल सामान्य नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. 

कोरोना व्हायरस प्रतिबंधाठी हुपरी येथे पोलीस, पालिका प्रशासन तसेच आरोग्य यंत्रणे कडून जोरदार कार्यवाही केली जात आहे. संचारबंदी काळात कोणीही रस्त्यावर येऊ नये यासाठी पोलीसांकडून गस्त घालून ध्वनिक्षेपकावरुन लोकांचे प्रबोधन करण्या बरोबरच योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. 
मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत लोक अधूनमधून दुचाकीवरुन भटकताना दिसून येत आहेत. 

आज येथील शनिवार आठवडा बाजार असल्याची संधी साधत सकाळी सकाळी कांही जण शहरात उगाचच दुचाकीवरुन फेरफटका मारत होते. ही बाब निदर्शनास येताच पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी अशा दुचाकीस्वारांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यांनी दुचाकीस्वारांकडे कारणांची चौकशी केली असता समर्पक उत्तरे देतांना बऱ्याच जणांची बोबडी वळली. काही जण खिशात औषधाच्या चिठ्ठ्या आणि गोळ्या टाकून बिनधास्त फिरत असल्याचे दिसून आले. 

त्यामुळे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दुचाकीस्वारांवर थेट कारवाई करत दंड वसूल केला. दरम्यान, कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्या कांही राजकीय पुढाऱ्यांचे पोलीस निरीक्षक श्री. मस्के यांना फोन आले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी कारवाई केलीच.

लोकांना भाजीपाला खरेदी विक्री साठी योग्य ती सोईस्कर यंत्रणा उभी केली आहे. गॅस सिलिंडर चा घरपोच पुरवठा केला जात आहे. अशा स्थितीत काही जण भाजीपाला खरेदीचे तर कोणी गॅस सिलिंडर, दवाखाना, औषध खरेदीचे निमित्त पुढे करून शहरात विनाकारण दुचाकीवरुन फिरत होते. वारंवार सूचना करूनही लोक लक्ष देत नव्हते. म्हणून दुचाकीस्वारांवर कारवाई केली असून ही मोहीम पुढे कायम राहील. 

- राजेंद्र मस्के, पोलिस निरीक्षक हुपरी पोलीस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Subsidy : 'एलपीजी सबसिडी' बंद होणार?; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Pune Election: सेम टू सेम आर्ची! पुण्याच्या निवडणुकीत आर्चीसारखी दिसणारी उमेदवार कोण?

Pune Political : सूत्रे हलली, रात्रीत चित्र बदलले; कोथरूडमध्ये भाजपकडून ‘डॅमेज कंट्रोल’, उमेदवारांची फेररचना!

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगरमध्ये चुरशीची तिरंगी लढत

Latur Crime : अहमदपूर तहसील कार्यालयात बनावट सह्या, शिक्के वापरून फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT