Husband and wife commit suicide in Akurde Kolhapur
Husband and wife commit suicide in Akurde Kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरातील आकुर्डेत पती-पत्नीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

गारगोटी : आकुर्डे (ता. भुदरगड) येथील पती- पत्नीने आजारास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. सदाशिव बाळू भांदिगरे (वय ६२) व सुरेखा सदाशिव भांदिगरे (वय ५७ ) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेने गावावर शोककळा पसरली. घटनेची भुदरगड पोलिसात नोंद झाली.

सदाशिव भांदिगरे हे मौनी विद्यापीठाचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. ते मनमिळावू व समजूतदार स्वभावाचे होते. यामुळे या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. दोघे पती-पत्नी आजारी होते. त्यांच्यावर औषधोपचार सुरु असून दोघेही आजाराला कंटाळले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आज दुपारी त्यांनी घरात कोणी नसल्याचे पाहून साडेबाराच्या सुमारास घराशेजारील जनावारांच्या गोठ्यात लोखंडी पाइईपला दोरी व ओढणी बांधून पती-पत्नीने गळफास घेतला. सकाळपासून दोघांचीही चाहूल न लागल्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध केली असता त्यांचे मृतदेह गोठ्यात लोंबकळत असल्याचे निदर्शनास आल्याची फिर्याद त्यांचे भाऊ निवृत्ती भांदिगरे यांनी पोलिसात दिली. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. गारगोटी रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्यामागे दोन विवाहित मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.  

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT