Husband of taluka panchayat member commits suicide in Kankumbi
Husband of taluka panchayat member commits suicide in Kankumbi 
कोल्हापूर

कणकुंबीत ता. पं. सदस्यांच्या पतीची आत्महत्या...

सकाळवृत्तसेवा

खानापूर (बेळगाव) - तालुका पंचायत सदस्या पुष्पा नाईक यांचे पती दिलीप विश्वनाथ नाईल (वय 55, रा.कणकुंबी) यांनी पतसंस्थेच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. खानापूर पोलिसात घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, दिलीप नाईक यांनी घराचा कांही भाग एका पतसंस्थेला भाडे तत्वावर दिला आहे.

रात्रीच्या वेळी ते त्या कार्यालयात झोपत असत. नेहमीप्रमाणे ते काल शुक्रवारी (ता. 03) ते झोपायला गेले. सकाळी उशिरापर्यंत ते उठून न आल्याने मुलगा त्यांना उठवायला गेला. त्यांनी पंख्याला गळफास घेतल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बसगौडा पाटील यांनी कर्मचाऱ्यासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. येथील सरकारी रुग्णालयात शवचिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला.

आज सायंकाळी (ता.04) त्यांच्यावर कणकुंबीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT