कोल्हापूर

हुश्श ः शिरोळमधील त्या युवतीचा अहवाल निगेटिव्ह

प्रतिनिधी

शिरोळ ः येथील उपनगरात भाडोत्री घरात राहत असलेल्या युवतीला श्‍वसनाचा त्रास होवू लागल्याने, गुरुवारी मध्यरात्री उपचारासाठी मिरज येथील शासकिय रुग्णालयात कोरोनाचा संशयित म्हणून दाखल केले होते. यामुळे शिरोळकर भयभित झाले होते. संबधीत युवतीच्या घेतलेल्या स्वॅबचा अहवाल रात्री उशिरा निगेटिव्ह आल्याने शिरोळकरांना तसेच तिच्या कुंटुबियाना दिलासा मिळाला आहे. 
शिरोळ तालुक्‍यातील एका गावातील कुंटुब,शिरोळच्या उपनगरात भाडयाच्या घरात राहात होते. या कुंटुबातील एक युवती, पुणे येथेनोकरीस होती. कोरोनाचा पादुर्भाव होऊ लागल्याने संबधीत युवती एक महिन्यापुर्वी घरी आली होती. प्रशासनाने तिला होम कारंटाईन केले होते. होम कॉरंटाईनचे 28 दिवसही झाले होते. तथापी गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास या युवतीला श्‍वसनाचा त्रास होऊ लागला. कुटुंबियांनी तिला उपचाराकरीता येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तथापी तिला कोरोनाची लक्षणे दिसु लागल्याने, येथील वेद्यकिय अधिकारयांनी, उपचाराकरीता तात्काळ मिरजेच्या शासकिय रुग्नालयात हालविले. 
ही माहिती शुक्रवारी सकाळपासूनच शिरोळ शहरात तसेच तालुक्‍यात सोशलमिडायातून पसरली होती. अनेक अफवांना उत आल्याने, प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना तसेच त्या उपनगरातील नागरीकांना तालुक्‍यातुन भ्रमणध्वनीवरुन माहिती विचारली जात होती. नगरपरीषदेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित युवतीच्या घरी जावुन, युवतीच्या भावाकडुन, त्या युवतीबाबत माहिती घेतली. त्यावेळी त्या युवतीला अस्थमाचा त्रास असल्याची माहिती पुढे आली. 
दरम्यान मिरज शासकिय रुग्नालयातील, व्यवस्थापनाने संबंधित युवतीच्या घशातील स्त्राव चाचणीकरीता घेतले होते. याबाबतचा अहवाल काय येतो? याकडे शिरोळकरांचे तसेच तालुक्‍याचे लक्ष लागुन राहिले होते. रात्री साडे आठ नंतर या युवतीचा कोरोनाबाबतचा अहवाल निगेटिव्ह आला. यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्‍वास सोडला. या युवतीची तब्बेत स्थिर असल्याचे माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी यांनी दिली आहे. तथापी या युवतीला पुढील कांही दिवस रुग्नालयातच विलगीकरणाच्या कक्षात उपचाराकरीता ठेवले जाणार आहे. 

नागरीकांनी घरातच राहुन प्रशासनास सहकार्य करावे. 
रात्री उशिरा संबंधित युवतीची कोरोनाबाबत घेतलेली पहिली चाचणी निगेटिव्ह आली आल्यामुळे शिरोळकरांना दिलासा मिळाला आहे. तथापी गरजेनुरुपच नागरीकांनी घराबाहेर पडावे. सोशल डिस्टन्सचा नियम पाळावा. असे आवाहन नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी शिरोळच्या जनतेला केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT