Hustle and bustle in the city; Peace in Canaangar 
कोल्हापूर

शहरात वर्दळ; कनाननगरात शांतता 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : संचारबंदी शिथिल झाल्यानंतर शहरात एकीकडे वर्दळ सुरू असताना कनाननगरात मात्र आज शांतता अनुभवायला मिळाली. कोरोनाचा रुग्ण आढळल्याने हा परिसर सील केला आहे. संचारबंदी थोडी शिथिल झाली असली तरी कनाननगरात मात्र भीतीचे वातावरण कायम आहे. जिल्हा प्रशासनाने शहरात काय सुरू राहणार व काय बंद राहणार याची घोषणा काल केली. चाळीस दिवस घरात कोंडलेल्या नागरिकांच्या संयमाचा बांध सुटला. कोरोनाचे संकट अद्याप कळलेले नाही, ही जाणीव त्यांच्यात राहिली नाही. सोशल डिस्टन्सचा फज्जा उठवत ते रस्त्यावर आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासकीय विश्रांतीगृहे, जिल्हा परिषद व आरटीओ कार्यालयाकडे जाण्यासाठी काही नागरिक जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे आले. या मार्गावरील बॅरिकेड्‌स अद्याप हटवले नसल्याने त्यांची कोंडी झाली. पोलिस यंत्रणेने त्यांना हा परिसर सील केला असून, अन्य ठिकाणांहून जाण्यास सांगितले. 

अन्नधान्याचा तुटवडा 
कनाननगरातील नागरिक अजूनही भयभीत आहेत. आवश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी ते बाहेर पडत आहेत. काही महिलांकडून मात्र घरातील जीवनावश्‍यक वस्तू संपल्या असून, अन्नधान्य कोण देणार अशी विचारणा होत आहे. आम्ही खायचे काय? असा प्रश्न उपस्थित करत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT