I am a farmer dug a pit in the river- Hassan Mushrif 
कोल्हापूर

नदीत खड्डे खोदलेला, वाकुरी मारलेला मी शेतकरी ः हसन मुश्रीफ

नरेंद्र बोते

कागल, कोल्हापूर : कोरड्या नदीत पाण्यासाठी खड्डे खोदलेला व उसात वाकुरी मारलेला मी जातिवंत शेतकरी आहे, पर्यटनासाठी बांधा- बांधावर जाणारा मी न्हवे असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. 
कागल शहराकडून जाधव मळ्यातून करनुरकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याच्या खडीकरण, रुंदीकरण, मजबूतीकरण व डांबरीकरण या कामाचा प्रारंभ कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी अतुल जोशी होते. यावेळी करनूर पानंद, वंदूर पानंद, मौलाली मळा पानंद, करंजे पानंद, पसारेवाडी पानंद, आदी पानंदीच्या खडीकरण, रुंदीकरण, मजबुतीकरणासह डांबरीकरणाच्या साडेसहा कोटी कामांचा शुभारंभ मंत्री मुश्रीफ यांच्याहस्ते संपन्न झाला. 
मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, "" 1972साली वडिलांच्या निधनानंतर थोरल्या बंधूंच्या नोकरीमुळे शेतीची जबाबदारी माझ्यावर पडली. महाविद्यालयीन शिक्षण करीत मी दररोज शेतात जायचो. 1980 -81 च्या दरम्यान काळम्मावाडी धरण नव्हतं. त्यावेळी नदीत शेतीच्या पाण्यासाठी मी खड्डे खोदलेला व उसात वाकुरी मारलेला मी जातिवंत शेतकरी आहे.'' माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, केडीसीसी बॅंकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, नगराध्यक्ष सौ. माणिक माळी, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, अतुल जोशी, पी. बी. घाटगे, नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर ,सतीश घाडगे, विवेक लोटे, बाबासाहेब नाईक सौ. शोभा लाड, सौ. माधवी मोरबाळे आदी प्रमुख उपस्थित होते. 
 

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: रुपाली चाकणकर सुनेत्रा पवारांच्या भेटीला

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रियेला खीळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तलवारी म्यान

Aadul News : रमजान ईदवर अवकाळी पावसाचे सावट; आडूळ परिसरात पिकांचे मोठे नुकसान

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द, उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम, मुख्यालय न सोडण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT