I-League Youth Football Canceled This Year Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

यंदा आय लिग युवा फुटबॉल रद्द

दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : नवोदित खेळाडूंच्या जडणघडणीत महत्वपुर्ण असणाऱ्या युवा इंडियन फुटबॉल लिग (आय लिग) यंदा रद्द करण्याचा निर्णय झाला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला. कोरोनामुळे या स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे यावर्षी 13, 15 आणि 18 वर्षाखालील स्पर्धा होणार नाहीत. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका खेळाडूंना बसणार आहे. पुढील हंगामात नियमित वयोगटाबरोबर 20 वर्षाखालील या नव्या वयोगटात स्पर्धा घेण्याचा निर्णयही झाला आहे. 

गेल्या पाच वर्षापासून शालेय फुटबॉलपटूूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी एआयएफएफतर्फे युवा आय लिग स्पर्धा घेतली जाते. प्राथमिक विभागीय, तर त्यातील अव्वल संघात मुख्य स्पर्धा घेतली जाते. फुटबॉलच्या प्रसारामुळे दरवर्षी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाची संख्या वाढते आहे. सुरवातीला केवळ 40 असणारी संख्या गतवर्षी दिडशेपर्यंत पोहोचली आहे. दरवर्षी या स्पर्धेत सहभागासाठी संघाकडून प्रस्ताव मागविले जातात. या प्रस्तावाचीं छाननी विशेष समितीतर्फे करून या संघाना मानाकंन दिले जाते. एआयएफएफने देशातील आय लिग आणि इंडियन सुपर लिग (आयएसएल) संघाना वयोगटांचे संघ सक्तीचे केले आहेत. 

खेळाडू घडविण्याच्या प्रक्रियेला गती मिळावी हाच यामागे उद्देश आहे. यामुळे 13, 15 आणि 18 वर्षाखालील खेळाडूंना दर्जेदार क्रीडासाहित्यासह उत्कुष्ठ प्रशिक्षण व साखळी स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. या स्पर्धातुन राष्ट्रीय संघाला देखील अनेक प्रतिभावान खेळाडू मिळाले. या स्पर्धेसाठी कोणताही प्रवास, भोजन अथवा निवास भत्ता दिला जात नाही. अशात आता यंदा स्पर्धाच रद्द झाल्याने हे व्यावसायिक संघ पदरमोड करुन वयोगटाच्या संघाची बांधणी करण्याची शक्‍यता कमी आहे. परिणामी, खेळाडूंच्या जडणघडणीलाच कोरोनामुळे ब्रेक लागणार आहे. यंदा अठरा वयोगटात असणाऱ्या खेळाडूंची संधी वाया जावू नये यासाठी पुढील हंगामात 20 वर्षीखालील या नव्या वयोगटातही स्पर्धा होणार आहे. 

खेळाडूंच्या विकासाला खीळ 
नवोदित फुटबॉलपटूंना मुळातच स्पर्धांच्या संधी खूप कमी आहेत. भारतात तर केवळ आय लिग स्पर्धा हेच व्यासपीठ आहे. अधिक सामने खेळल्यामुळेच खेळाडूंची निर्णयक्षमता विकसित होते. परिक्षा नसल्या कि विद्यार्थी अभ्यास करत नाहीत, त्याचप्रमाणे स्पर्धा रद्द झाल्याने खेळाडूंचा सरावातील स्वारस्य कमी होण्याची भिती आहे. साहजिकच या स्पर्धा रद्द झाल्याने खेळाडूंच्या विकासाला जणू खीळ बसणार आहे. 

संपादन - सचिन चराटी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Vehicle Rules: वाहन चालकांसाठी मोठा दिलासा! गाड्यांच्या सेफ्टी रडारसाठी आता लायसन्सची गरज नाही; सरकारचा मोठा निर्णय

KANE WILLIAMSON RETIRES: आता कोणाची फलंदाजी पाहायची? केन विलियम्सनच्या निवृत्तीने डोकं सून्न, क्रिकेटमधील एका 'सभ्य' युगाचा अंत!

Navi Mumbai: कोंडीमुक्त नवी मुंबईसाठी नवे धोरण लागू! बेशिस्त पार्किंगला चाप बसणार, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

Bal Sangopan Yojana: महाराष्ट्रातील अनाथ मुलांना दरमहा २५०० रुपये मिळणार, महायुती सरकारची नवी योजना; लाभ कसा घेता येणार?

महाडचा तो ऐतिहासिक लढा पुन्हा जिवंत होणार; माजी मंत्र्यांनी लिहिलेले 'हे' नाटक प्रेक्षकांच्या भेटीला!

SCROLL FOR NEXT