In Ichalkaranji, 35 Percent Vegetables Are Not Sold Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजीत 35 टक्के भाजीपाला शिल्लक

ऋषीकेश राऊत

इचलकरंजी : शेतकऱ्यांनी शेतातील तयार भाजीपाला तोडला आणि विक्रीसाठी बाजार समितीत आणला; मात्र विकेंड लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात हा भाजीपाला खरेदीदार, व्यापारी व ग्राहकांकडून खरेदी केला गेला नाही. इचलकरंजी शहरात शुक्रवारी आलेल्या एकूण भाजीपाल्यापैकी सुमारे 35 टक्के भाजीपाला शिल्लक राहिला. विकेंड लॉकडाऊनमुळे हा भाजीपाला आता कुजण्याच्या मार्गावर आहे. 

वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे एकीकडे भाजीपाल्याचे दर वाढत आहेत; मात्र शुक्रवारी शहरात विक्रीसाठी आलेला भाजीपाला कवडीमोल ठरला. शेतात तयार झालेला माल आणि विकेंड लॉकडाउनमुळे भाजीपाला विक्रीचे नियोजन शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचेही फसले. मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दरात आपोआप घट झाली. सर्व प्रकारचा भाजीपाला निम्म्या किमतीने स्वस्त झाला. कृषी उत्पन्न वडगाव बाजार समितीत शुक्रवारी दाखल झालेल्या भाजीपाल्यामुळे अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. पहाटेपासून शेतकऱ्यांची लगबग बाजार समितीत सुरू होती. पहिल्यांदाच कर्नाटक सीमाभागातून भाजीपाल्याची सुमारे 55 टक्के आवक झाली. 

अडतदार व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी केला. आवकच प्रचंड झाल्याने कवडीमोल दरात सौदे झाले. मिळेल त्या भावाने शेतकऱ्यांनी भाजीपाला विकला. कोरोनामुळे पहिल्यांदाच इतक्‍या मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे दर पडले. भाजीपाला खरेदी करून ठेवलेल्या अडतदार व्यापाऱ्यांची स्थिती चिंता करणारी ठरली. इतर वेळी दुपारनंतर सामसूम असणाऱ्या बाजार समितीत सायंकाळपर्यंत ठिकठिकाणी शिल्लक भाजीपाल्याची अवस्था जैसे थे होती. खरेदीदार, व्यापारी व ग्राहकांकडून अपेक्षित भाजीपाल्याची खरेदी झाली नाही. त्यामुळे दैनंदिन आवकेतील सुमारे 35 टक्के भाजीपाला शिल्लक राहिला. 

नेहमीपेक्षा दीडपट भाजीपाला 
विकेंड लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणात खरेदीच्या अपेक्षेने भाजीपाला बाजार समितीत दाखल झाला. दैनंदिन भाजीपाल्याची आवकतेच्या तुलनेत शुक्रवारी दीडपट आवक झाली. अपेक्षित भाजीपाल्याची विक्रीही झाली नाही. परिणामी दर पडले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारचा भाजीपाला शिल्लक राहिला. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, Video: बुमराह आला अन् दुसऱ्याच बॉलवर विकेट घेतली! भुवनेश्वर कुमारच्या पंक्तीत मिळवलं स्थान

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? सौदीची पाइपलाइन बंद, फक्त ५ ते ७ दिवसांचा तेलसाठा शिल्लक

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

SCROLL FOR NEXT