Ichalkaranji Continues Spinning Even During Weekend Lockdown Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

वीकेंड लॉकडाउनमध्येही वस्त्रनगरीत खडखडाट सुरूच

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : वीकेंड लॉकडाउनमध्ये शहर पूर्णतः ठप्प होते. यंत्रमाग उद्योगाचा खडखडाट मात्र कायम राहिला. दोन दिवस कापड उत्पादनात कोणताही खंड पडला नाही. त्यामुळे या उद्योगाला दिलासा मिळाला आहे. तसेच, कामगारांनाही आधार मिळाला. 

वीकेंड लॉकडाउनमुळे शहरातील अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहिले. पण, यंत्रमाग उद्योग सुरू राहणार की बंद ठेवावा लागणार, याबाबत सुरवातीला संभ्रमावस्था होती. मात्र, योग्य खबरदारी घेऊन उद्योग सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे वीकेंड लॉकडाउनचा कोणताही परिणाम या उद्योगावर झाला नाही. 

शहरातील 24 तास चालणाऱ्या या उद्योगाचा खडखडाट अखंडित सुरू राहिला. कामगारांनाही रोजगार मिळाला. सायझिंग उद्योगही सुरू राहिल्याने सुताची बिमे या उद्योगासाठी उपलब्ध झाली. त्यामुळे कापड उत्पादनात खंड पडला नाही. मात्र, उद्योग सुरू करताना अनेक अडचणी आल्या. सूत व्यापार बंद राहिल्याने नवीन सूत उपलब्ध झाले नाही. जुन्या साठ्यावरच सध्या तरी हा उद्योग तरला आहे. दुरुस्तीसाठी किरकोळ स्वरूपात यंत्रमाग उद्योग बंद राहिले. दुरुस्तासाठी आवश्‍यक असणारे साहित्य उपलब्ध न झाल्याने असे उद्योग बंद ठेवावे लागले. पण, त्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. एकूणच वीकेंड लॉकडाउनचा फारसा परिणाम यंत्रमाग उद्योगावर जाणवला नाही. 

कामगार धास्तावले 
सध्या यंत्रमाग उद्योग सुरू आहे. पण, लॉकडाउनचा कालावधी वाढला तर मात्र या उद्योगावर परिणाम होण्याची दाट शक्‍यता आहे. यंत्रमाग उद्योगाला पूरक आस्थापना बंद राहील. त्यामुळे आठवडाभरानंतर त्याचा परिणाम यंत्रमाग उद्योगावर जाणवण्याची भीती आहे. त्यामुळे कामगार वर्ग धास्तावला. 
 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आता रेस्टॉरंटमध्ये बाटलीबंद पाणी खरेदीची सक्ती नाही; FDA कडून आदेश लागू, नवीन नियम नेमके काय आहेत?

IND vs IRE 1st T20I Live: वैभव सूर्यवंशीला का नाही खेळवले? श्रेयस अय्यर बघा काय म्हणाला; आमच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत अन्...

रोज केस धुवू शकत नाही म्हणून... केसांसाठी 'हा' शॅम्पू वापरते प्राजक्ता गायकवाड; स्वतः सांगितलं नाव आणि उपयोग

Mahanagar Gas Limited: 90 दिवसांत PNG घ्या, नाहीतर LPG बंद! मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना

IND vs IRE 1st T20I Live: वैभव सूर्यवंशीचे पदार्पण झाले का? श्रेयस अय्यरच्या निर्णयाने सारे चकीत... पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT