Ichalkaranji duo arrived in the morning from the ambulance from Telangana state 
कोल्हापूर

इचलकरंजीत ते दोघे पहाटेच झाले दाखल अन् उडाली एकच धांदल....

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : तेलंगणा राज्यातून रुग्णवाहिकेमधून पहाटेच्या सुमारास इचलकरंजीत दोघेजण दाखल झाले. शेजारी राहणाऱ्या नागरीकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारानंतर प्रशासनाची तारांबळ उडाली. 

पालिका प्रशासनासह गावभाग पोलिसांनी त्यांचा शोध घेवून ताब्यात घेतले. पारसमल मेहेरसिंग राजपुरोहित (वय ३०, रा. सिनेर, राजस्थान) व मोहनसिंग वितरसिंग राजपुरोहित (२४, रा. बीजेपी मार्केट, इचलकरंजी) अशी दोघांची नावे आहेत. त्या दोघांसह अनोळखी रुग्णवाहिका चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. तर दोघांची प्राथमिक तपासणी करून त्यांना पंचरत्न विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले.

नागरिकांची सतर्कता

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असतानाही येथील मंगलमूर्ती चित्रमंदिर परिसरात रुग्णवाहिकेतून काहीजण तेलंगणा राज्यातून आल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली. त्यांनी याबाबतची माहिती व पालिका व पोलिस प्रशासनाला दिली. चौकशी केली असता पारसमल राजपुरोहित व मोहनसिंग राजपुरोहित हे दोघेजण पहाटेच्या सुमारास रुग्णवाहिकेमधून आल्याची माहिती मिळाली.

अंधाऱ्यां रात्री ते दोघे दाखल

गुरुवारी दुपारच्या सुमारास तेलंगणा राज्यातील वारंगल येथून निघाले होते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ते येथील मंगलमूर्ती टॉकीजजवळ नातेवाईकांकडे आले. गावभाग पोलिस व पालिका आरोग्य विभागाच्या पथकाकडून या दोघांना ताब्यात घेण्यात आले. प्रथम गावभागातील आरोग्य केंद्रात त्यांची तपासणी करण्यात आली. याबाबतची माहिती समजल्यानंतर प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी तातडीने दोघांची इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात तपासणी करुन त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्याच्या सुचना केल्या.यावेळी पोलिस उपअधिक्षक गणेश बिरादार उपस्थित होते. तपासणीनंतर मोहनसिंग व पारसमल राजपुरोहित यांना विलगीकरण केंद्रात पाठविण्यात आले आहे.


 दोघा राजपुरोहितांना आणणारा रुग्णवाहिका चालक मात्र वाहनासह निघून गेला. गावभाग पोलिसांनी त्या चालकासह दोन्ही राजपुरोहितांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने पोलिस प्रशासन यंत्रणा हडबडून गेली आहे. तपासणी नाक्यावर प्रत्येक वाहनाची सतर्कतेने तपासणी करावी, अशा सक्त सूचना मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी कर्मचाऱ्यांना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT