Ichalkaranji exercises while searching for the keys of confiscated vehicles 
कोल्हापूर

जप्त वाहनांच्या चाव्या  शोधताना इचलकरंजीत कसरत 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या कालावधीत जप्त केलेली वाहने परत देताना गोंधळ निर्माण होत आहे. अनेक वाहनांची कागदपत्रे नसल्यामुळे वाहने ताब्यात घेताना अडचण येत आहे. वाहनांच्या चाव्या शोधताना कसरत करावी लागत आहे. 
रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली होती. वाहतूक पोलिसांसह शिवाजीनगर, गावभाग व शहापूर पोलिसांनी अनेक वाहने जप्त केली होती. काही दिवसांपूर्वी दंडात्मक कारवाई करून वाहने परत देण्याचे जाहीर केले. दंड भरल्यानंतरही गाडी ताब्यात घेताना कसरत करावी लागत आहे. 
अनेकांना वाहन कोठे आहे, याचीच माहिती नाही. वाहन शोधण्यातच अनेकांच्या फेऱ्या होतात. वाहनाचा शोध लागल्यानंतर त्याची चावी शोधण्यात वेळ जात आहे. जप्त करताना सर्व वाहनांच्या चाव्या एकत्र केल्या आहेत. अनेक वाहनांची कागदपत्रे नाहीत. नवीन कागदपत्रे तयार करण्यासाठी वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. 

प्रक्रिया येथे सुरू 
वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईतील वाहने परत देण्यासाठी मध्यवर्ती बस स्थानकात स्वतंत्र कक्ष उभारले आहेत. तेथे सोशल डिस्टन्सिंग ठेवून दंड आकारणी सुरू आहे. तेथेच वाहनांच्या चाव्या पसरून ठेवल्या आहेत. त्यातून वाहनाच्या चावींचा शोध घेतला जात आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं सलग 6 व्या दिवशी महाग! 1.5 लाखांचा टप्पा पुन्हा ओलांडला; मुंबईत आजचा ताजा भाव किती?

April Fool Day 2026: एप्रिलच्या पहिल्या दिवशीच का साजरी केला जातो एप्रिल फूल्स डे? जाणून घ्या महत्त्व अन् इतिहास

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'ओडिशा स्थापना दिना'निमित्त दिल्या शुभेच्छा

Ahilyanagar Murder Case: खूनप्रकरणी बापलेकाला शिक्षा; अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल, एकास सक्तमजुरी!

हीच तर खरी संस्कृती! प्रियांका चोप्राने सुवर्ण मंदिरात जमिनीवर बसून सगळ्यांसोबत घासली भांडी, देसी गर्लच्या सेवेचं कौतूक, Viral Video

SCROLL FOR NEXT