In Ichalkaranji Fines Vehicle Owners Over Rs 1 Crore During The Year Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजीत वर्षभरात वाहनधारकांना कोटीवर दंड

ऋषीकेश राऊत

इचलकरंजी : वर्षभरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी उपाययोजनांबरोबरच बेशिस्त वाहतुकीला चाप लावला. कारवाईचा बडगा मोठ्या प्रमाणात उगारत तब्बल 1 कोटी 10 हजारांचा दंड वाहनधारकांना ठोठावला. वर्षभरात 43 हजार 83 अशा कारवाई केल्या. सर्वाधिक चारचाकी वाहनांवर एकूण दंडाची सुमारे 25 टक्के कारवाई केली, अशी माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

1 जानेवारी ते 31 डिसेंबरदरम्यान वाहतूक शाखेने बेशिस्त वाहतुकीला लगाम घातला आहे. सायलेंसर बदल, मॉडीफाय, कर्णकर्कश हॉर्न, प्रखर दिवे, विदाऊट व फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट, वेगात वाहने, नो मिरर, हुल्लडबाजी वाहने, नो सिट बेल्ट अशा बेशिस्त नानाविध वाहनधारकांवर कारवाई केली.

43 हजार 483 वाहनांवर 1 कोटी 10 हजार 700 रुपयांची दंडात्मक कारवाई वाहतूक शाखेने केली. वाहतूक शाखेच्या इतिहासात 1 कोटीचा दंड पहिल्यांदाच केलेला आहे. 2019 च्या तुलनेत कारवाईचे प्रमाण तिप्पट असून दंडामध्ये 31 लाखांची भर पडली आहे. शहराचा आवाका पाहता अपेक्षित कर्मचारी नसतानाही कारवाई आणि वाहतूक शिस्तीसाठी वाहतूक शाखा प्रयत्नशील राहिली. यापुढे वाहनधारकांनी वाहने नियमाप्रमाणे चालवावीत अन्यथा कडक कारवाईची प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे श्री. मोरे यांनी सांगितले. 

ड्राइव्ह मोहीम प्रभावी 
विना नंबर प्लेट व धूम स्टाईल वाहनांवर वाहतूक शाखेने राबवलेला ड्राइव्ह शहरात प्रभावी ठरला. या ड्राइव्हद्वारे हुल्लडबाज वाहनधारकांना लगाम घालून डिसेंबरमध्ये तब्बल 11 लाखांचा दंड वसूल केला. 75 हून अधिक बुलेटस्वारांवर कारवाई केली. घरफोडी, जबर चोरी तपासाच्या अनुषंगाने 1250 विना नंबर प्लेट वाहनांवरील ड्राइव्ह पोलिसांच्या कामी आला. 

अनपेडसाठी विशेष मोहीम 
एकूण दंडापैकी सुमारे निम्मा दंड अनपेड स्थितीत आहे. त्यामुळे सध्या अनपेड असलेल्या दोनपेक्षा अधिक केसीस असलेल्या वाहनधारकांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर अनपेड वाहनधारकांशी संपर्क साधून अथवा थेट घरी वसुलीच्या नोटिसा पाठवल्या जाणार आहेत, असे श्री. मोरे यांनी सांगितले. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT