ichalkaranji hospital clean problem solve 10 extra worker in hospital kolhapur 
कोल्हापूर

आयजीएम रुग्णालयाच्या स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी; इचलकरंजी पालिका नगराध्यक्षांचे आदेश

पंडित कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर) : येथील शासनाच्या आयजीएम रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्‍न तुर्तास मार्गी लागणार आहे. यासाठी पालिका प्रशासनाकडून 10 सफाई कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याबाबतचा आदेश आज नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी दिला आहे. या कर्मचार्‍यांची नियुक्ती तात्पुरत्या स्वरुपात असणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्वाचा समजला जात आहे.

पूर्वी आयजीएम रुग्णालय पालिकेच्या ताब्यात होते. सद्या हे रुग्णालय शासनाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून या रुग्णालयाला पून्हा कोविड रुग्णालय म्हणून मान्यता दिली आहे. तथापि, या रुग्णालयाकडे पहिल्या टप्प्यातील कोरोना काळात कंत्राटी पध्दतीने कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुदत संपल्यानंतर या कर्मचार्‍यांना कमी करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर बनला. आमदार प्रकाश आवाडे यांनी या प्रश्‍नाकडे सातत्याने लक्ष वेधले. शासनकडूनही याबाबत फारसे सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे सातारा येथील एका स्वंयसेवी संस्थेकडून तात्पुरत्या स्वरुपात मोफत स्वच्छतेची सोय आमदार आवाडे यांनी उपलब्ध करुन दिली.

दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने पालिकेकडे तात्पुरत्या स्वरुपात 10 सफाई कर्मचारी देण्याची मागणी केली. त्यानुसार वेतन व भत्त्यासह कर्मचारी देण्याचा ठराव पालिका सभेत करण्यात आला. पण रुग्णालय प्रशासनाकडून यासाठी पूरक अनुदान मिळत नसल्याचे स्पष्ट करुन वेतन व भत्ते देण्याची जबाबदारी घेतली नाही. त्यामुळे हा प्रश्‍न प्रलंबीत पडला होता. शहरात पून्हा कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. आयजीएम रुग्णालयावर पून्हा ताण वाढत आहे. अशा परिस्थीतीत स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी सफाई कर्मचारी देण्याचा विषय पून्हा चर्चेत आला.

नुकत्यात पालिकेत झालेल्या शहर सनियंत्रण समितीच्या बैठकीतही याबाबत चर्चा झाली. अखेर प्रशासनाच्या प्रस्तावानुसार 10 सफाई कर्मचारी आयजीएम रुग्णालयास प्रतिनियुक्तीवर देण्यास नगराध्यक्षा स्वामी यांनी आज मंजुरी दिली. त्यानुसार सात पुरुष व तीन महिला सफाई कर्मचारी आयजीएम रुग्णालयासाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या काळात पालिकेकडून करण्यात आलेली ही मदत अत्यंत महत्वाची असणार आहे. यातून तुर्तास तरी रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.

नगराध्यक्षा स्वामी यांची सक्त सूचना

आयजीएम रुग्णालय हे कोविड रुग्णालय करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी काम करतांना कोरोना संसर्ग होणार नाही, याची मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. याबाबत नगराध्यक्षा स्वामी यांनी संबंधित सफाई कर्मचार्‍यांची आवश्यक ती सर्व काळजी घेण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT